शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी मशागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:42 IST

जळगाव जिल्ह्णात बैठका, मेळावे, यात्रांचा धडाका सुरु

विकास पाटीलआगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. संघटन मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी तसेच मतदारांना जागृत करण्यासाठी जळगाव जिल्ह्णात बैठका, मेळावे, यात्रांचा धडाका सुरु केला आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ग्रामीण भागात होण्याचा मान स्वातंत्र्यपूर्व काळात १९३६ मध्ये फैजपूरला मिळाला होता. तेथून काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढली. त्यात काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते सहभागी झाले. देशाला वाचवायचे असले तर भाजपाला हद्दपार करा, देशाला आरक्षणापेक्षा संरक्षणाची गरज आहे. केंद्र व राज्यातील सरकार हे असंवेदशील आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी व फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. ही जनसंघर्ष यात्रा जळगाव जिल्ह्णातील आठ तालुक्यांमधून निघाली. पुढे धुळे व नंदुरबार जिल्ह्णातून नाशिक जिल्ह्णाकडे रवाना झाली.ही यात्रा जिल्ह्णातून रवाना होत नाही तोच भाजपानेही जळगावात जिल्हास्तरीय मेळावा घेतला. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पक्षाचेखासदार, आमदार उपस्थित होते. भाजपाची जिल्ह्णात ताकद वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी व काँग्रेसचा सफाया होईल व शिवसेनेचा एकही आमदार निवडणूक येणार नाही, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. या त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने पत्रपरिषद घेवून जोरदार आक्षेप घेतला. महाजनांचा हा विश्वास जनतेच्या बळावर नव्हे तर इव्हीएम मशीनमध्ये करण्यात येत असलेल्या सेटींगवर असल्याचा आरोप केला.काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा, भाजपाची जिल्हा बैठक व आता गेल्या तीन दिवसांपासून राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे जळगाव जिल्ह्णात मुक्कामी आहेत. चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, पाचोरा या सात तालुक्यांचा त्यांनी दौरा केला. त्यात त्यांचा ‘फोकस’ युवक, युवती, महिला तसेच डॉक्टर्स, वकील, व्यापारी, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मंडळींकडेअसल्याचेदिसूनआले.त्यांनीत्यांच्याशीसंवादसाधला. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत आगामी काळात या समस्या मार्गी लावण्यासाठी राष्टÑवादीला साथ द्या असे आवाहन करीत पक्षाचा प्रचार केला.जळगाव जिल्ह्णात पक्षाचा एकमेव आमदार असताना खासदार सुळे यांनी तब्बल चार दिवस दिले. पहिल्यांदाच राज्यस्तरावरील एका नेत्याने जळगावात चार दिवस मुक्काम केला असावा. एवढी मेहनत तर मनपा निवडणुकीतही राष्टÑवादी काँग्रेसने घेतली नाही.सुळे यांच्या दौºयापूर्वी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही जळगाव जिल्ह्याच्या दौºयावर येवून गेले. त्यांनी तब्बल आठ तास जळगावकरांना दिले. जळगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पुन्हा १०० कोटी देणार. समांतर रस्ते, गाळेप्रश्न, हुडको कर्ज आणि शिवाजीनगर उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरच म ार्गी लावणार, शेळगाव बॅरेज व वरखेडे लोंढे हे रखडलेले प्रकल्पही वर्षभरात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी देवून जिल्हावासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने प्रमुख राजकीय पक्षांकडूनही मेहनत घेतली जात आहे. मतदार हुशार आहे. कुणी कितीही आश्वासने दिली तरी यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्यांनीही काय ‘दिवे’ लावले, हेही मतदारांना चांगले ठावूक आहे. त्यामुळे मेळावे, बैठका, यात्रा, पत्रपरिषदांद्वारा जनतेचे चांगले मनोरंजन होत आहे, हे मात्र नक्की.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव