शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जळगावात ९९८ कोटींची कर्जमाफी होऊनही शेतकरी सावकारांच्या दारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 8:43 AM

९९ नोंदणीकृत सावकारांनी दिलेय दीड कोटींचे कर्ज: ५ अवैध सावकारांवर झालीय कारवाई

- सुशील देवकर

जळगाव : शासनाकडून जिल्ह्णात आतापर्यंत तब्बल ९९८ कोटींची कर्जमाफी दिल्याचा दावा केला जात असला तरीही बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालेला नाही. त्यामुळे त्यांना खरीपासाठी कर्जच मिळू शकले नाही. त्या शेतक-यांना नाईलाजाने सावकारांच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत ९९ सावकारांनी या वर्षी ९३० शेतक-यांना १ कोटी ४३ लाखांचे कर्ज दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र अवैध सावकारांकडील आकडेवारी अधिक असण्याची शक्यता आहे.

शेतक-यांना बँक, सोसायट्यांकडून हंगामात व वैयक्तिक कारणासाठी कर्ज न मिळाल्यास त्यांना नाईलाजाने सावकाराकडे हात पसरावा लागतो. सावकार नोंदणीकृत असेल तर शासनाने ठरवून दिलेल्या दराने व्याज आकारणी करतो. मात्र बहुतांश शेतकरी गावातीलच अवैध सावकारी करणा-यांकडून रक्कमेची उचल करतात. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. जिल्ह्णात नोंदणीकृत सावकारांसोबतच अवैध सावकारांकडेही मोठ्या प्रमाणावर शेतक-यांना नाईलाजाने जावे लागत आहे. सहकार विभागाने टाकल्या ९ धाडी जिल्ह्यात अवैध सावकारी जोरात सुरू असल्यानेच शेतक-यांच्या परिस्थितीचा, गरजेचा गैरफायदा घेण्याचे, त्यांना लुबाडण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

मात्र पुन्हा त्याच सावकाराकडे हात पसरावे लागणार असल्याचे माहिती असल्याने शेतकरी तक्रार करण्यास धजावत नाही. तरीही वर्षभरात सहकार विभागाने जिल्ह्णातील अवैध सावकारांवर ९ धाडी टाकून त्यापैकी २ प्रकरणी ५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सावकारांनी शेतक-यांकडून हडप केलेली स्थावर मालमत्ता परत करण्याच्या संदर्भात एकूण ६ प्रकरणात कलम १८ अन्वये सहकार विभागाकडे सुनावणी सुरू आहे. उघडकीस आलेली प्रकरणे ही केवळ हिमनगाचे टोक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

चार वर्षात सावकारांची संख्या कायमअवैध सावकारांकडून शेतक-यांची लुबाडणूक होत असल्याने शासनाने त्याला आळा घालण्यासाठी सावकारांना परवाने देण्याची पद्धत सुरू केली आहे. या नोंदणीकृत सावकारांना शासनच कृषी कर्ज व बिगर कृषी कर्ज, तारणी कर्ज व बिगर तारणी कर्ज असे चार प्रकारांसाठी व्याजदर ठरवून देत असते. या नोंदणीकृत सावकारांची संख्या गेल्या चार वर्षांपासून कायम आहे. २०१५-१६ मध्ये ९८ नोंदणीकृत सावकार होते. २०१६-१७ मध्ये ही संख्या ८९ झाली. २०१७-१८ मध्ये १०३ तर २०१८-१९ मध्ये नोंदणीकृत सावकारांची संख्या ९९ झाली आहे.

९३० शेतकऱ्यांना दिले कर्जजिल्ह्णात यंदा ९९ सावकारांनी नोंदणी केली असून त्यांनी आतापर्यंत ७८० शेतक-यांना (व्यक्तींना) सोने, जमीन तारणावर १ कोटी १२ लाख २२ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर १५० शेतक-यांना ३१ लाख ८ हजारांचे कर्ज वाटप केले आहे. बँकांनी हात वर केल्याने शेतक-यांना नाईलाजाने सावकाराची पायरी चढावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी