फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:38 IST2019-10-10T17:36:21+5:302019-10-10T17:38:26+5:30

जामनेर येथील सभेत सरकारवर टीका

Farmers committed suicide during Fadnavis - Jayant Patil | फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या - जयंत पाटील

फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या - जयंत पाटील




जामनेर : तालुक्यातील मतदारांमध्ये भाजप विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली असून, पराभवाची सुरुवात जामनेरमधूनच होईल, असे राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी गुरुवारी येथील बोहरा मंगल कार्यालयात झालेल्या सभेत सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय गरुड यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर त्यांनी टीका केली. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ते चामोगिरी करतात, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे प्र्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गरुड यांना विजयी करण्याचे आवाहन करीत जामनेरचा माणूस पडला तरच इतर पडतील, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे सांगून त्यांनी शासनावर टीका केली. संजय गरुड, सुभानअली शेख व प्रफुल्ल लोढा यांची भाषणे झाली.
जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, डी.के.पाटील, प्रदीप लोढा, शंकर राजपूत, अ‍ॅड. ज्ञानेश्वर बोरसे, राजेंद्र पाटील, किशोर पाटिल, डॉ.ऐश्वरी राठोड, प्रमिला पाटील, वंदना चौधरी, सरोजनी गरुड, प्रमोद पाटील, माधव चव्हाण, अनिल बोहरा, गफ्फार मलीक, डॉ.प्रशांत पाटील, अनिस पठाण, अशफाक पटेल, पारस ललवाणी, प्रल्हाद बोरसे, सुनील पाटील, गणेश झाल्टे आदी उपस्थित होते.

 

 

 

Web Title: Farmers committed suicide during Fadnavis - Jayant Patil