शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लेकरासाठी भीक मागून भरली वकिलाची फी, नियतीने अंध माय-लेकींचा गुदमरला श्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 10:28 IST

अंध माय-लेकी उन्हातान्हात भीक मागून कुटुंबाच्या दोन वेळेची भ्रांत निस्तरतात आणि मिळालेल्या पैशांतून वकिलाची फीही भरतात.

कुंदन पाटीलजळगाव : चोरीच्या गुन्ह्यात जळगाव कारागृहात एकुलते एक लेकरू बंद आहे. त्याच्या सुटकेसाठी शिरपूरचे एक आदिवासी कुटुंब येथे येऊन धडकले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बसस्थानकावर फाटका संसार मांडलेला आहे. अंध माय-लेकी उन्हातान्हात भीक मागून कुटुंबाच्या दोन वेळेची भ्रांत निस्तरतात आणि मिळालेल्या पैशांतून वकिलाची फीही भरतात.. असा दिनक्रमच  या परिवाराच्या नशिबी आला आहे.

खलीबाई आणि बाबूलाल पावरा (रा. सांगवी, शिरपूर) या दाम्पत्याच्या घरी वर्षानुवर्षे दु:खाचा जणू मुक्कामच आहे. एकापाठोपाठ सहा लेकरे दगावली. सातवा संदीप जगला. पाठोपाठ बसंती आली; पण ती जन्मत:च अंध. कालांतराने आई खलिबाईचीही दृष्टी गेली. संदीप आता हाताशी आला होता. बाबूलाल व तो मजुरी करत होते. परंतु एका बॅटरी चोरीत संदीपला अटक झाली. त्याची रवानगी जळगाव कारागृहात झाली. तेव्हा पावरा कुटुंबाने शनिवारी जळगाव गाठले.  

प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन जमविले पैसे...बाबूलाल कारागृहाच्या दारावर गेला. तेथील पोलिसाला त्याची दया आल्याने त्यानेच एका वकिलाला फोन लावला. वकिलाने मोफत काम करण्याची तयारी दर्शविली; परंतु दस्तावेजासाठी चारशे रुपये लागतील असे सांगितले. तेव्हा अंध माय-लेकीने भीक मागून पैसे जमवले. प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन पैसे वकिलाकडे सुपुर्द केले. आता पावरा दाम्पत्य सोमवारची वाट बघते आहे. त्यांचा संदीप कारागृहाबाहेर येणार म्हणून.

टॅग्स :Jalgaonजळगाव