जळगाव : जळगाव व धरणगाव तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या तब्बल आठ ट्रॉल्या चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. ट्रॉली चोरीच्या घटना वाढल्याने शेतकरी कमालीचे हादरले आहेत. या चोरीमागे वाळू माफियांवर संशय व्यक्त केला जात आहे. जळगाव तालुका व शहरातील शेतकºयांनी पोलिसात तक्रारी केलेल्या नाहीत.दरम्यान, काही ठिकाणच्या प्रकरणात वाळू माफियांसह उस तोड करणारे मजूर किंवा कंत्राटदार यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथील अरुण विश्वास शिरसाठ, कल्याणे खुर्द येथील साहेबराव उदेसिंग पाटील व टाकळी येथील काही शेतकºयांच्या ट्रॉल्या लांबविण्यात आल्या आहेत. चोरट्यांनी ट्रॉली चोरण्यासाठी ट्रॅक्टर आणले असून त्याला जोडून ट्रॉली नेण्यात आली.कल्याण खुर्द येथील ट्रॉली चोरुन नेताना चोरटे रस्ता विसरले होते, नंतर परत मागे येऊन ते दुसºया मार्गाला लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, मात्र ट्रॅक्टर जात असताना ट्रॉली चोरली असावी अशी शंका नसल्याने गावकरीही गाफील राहिले.वाळू तस्करांचा असाही फंडाजिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वाळूचे ठेके गेलेले नाहीत, त्यामुळे शहरासह परिसरातून वाळूची होत असलेली वाहतूक अवैधच आहे. वाळू वाहतूक करताना यंत्रणेतील काही घटकांना माफियांनी हाताशी धरले आहे. काही ओरड झाली किंवा तक्रार झाली तर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला एखादी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आले तर ट्रॉली जागेवरच सोडून चालक ट्रॅक्टर घेऊन पसार होतो. त्यामुळे ट्रॉलीचा मालक कोण हे निष्पन्न होत नाही, आणि झालाच तर ट्रॉलीच चोरी झाल्याचे निदर्शनास येते. हा नवीन फंडा वाळू तस्करांनी वापरायला सुरुवात केली आहे. गिरणा नदीपात्रापासून अवघ्या १५ ते २० किलो मीटर अंतरावर असलेल्या गावातूच ट्रॉली चोरी झाल्या आहेत.नदीपात्रात वाळूच्या ढिगाºयात सापडली एक ट्रॉलीकल्याणे होळ व हिंंगोणे भागातून चोरलेली एक ट्रॉली अमळनेर तालुक्यातील नदीपात्रात वाळूच्या ढिगाºयात आढळून आली. या ट्रॉलीवर वाळू टाकण्यात आली होती. त्यामुळे वाळू व्यवसाय करणाºयांनी तसेच मध्यप्रदेशात उस तोड करण्यासाठी जाणाºयांनी या ट्रॉल्या चोरल्याचा संशय आहे. शेतकºयांचे होणारे नुकसान व ट्रॉली चोरीची नवी पध्दत पाहता पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
वाळूसाठी ८ ट्रॉल्या लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:16 IST