जळगावला थांबणाऱ्या सहा गाड्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST2021-01-21T04:16:20+5:302021-01-21T04:16:20+5:30

इन्फो : अमरावती एक्स्प्रेस सोमवारपासून कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद असलेली अमरावती-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस ही गाडी २५ जानेवारीपासून ...

Extension to six trains stopping at Jalgaon | जळगावला थांबणाऱ्या सहा गाड्यांना मुदतवाढ

जळगावला थांबणाऱ्या सहा गाड्यांना मुदतवाढ

इन्फो :

अमरावती एक्स्प्रेस सोमवारपासून

कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद असलेली अमरावती-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस ही गाडी २५ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. या गाडीच्या तिकीट आरक्षणाला बुधवारपासून सुरुवात झाली असून, मुंबईला जाण्यासाठी जळगावला ही गाडी रात्री साडेअकरा वाजता येणार आहे. तर मुंबईहून जळगावला पहाटे तीन वाजता येणार आहे.

इन्फो :

शनिवारपासून तीन दिवस मेगाब्लॉक

ठाणे व मुलुंड स्टेशनच्या दरम्यान एका ठिकाणी उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे २३ ते २५ जानेवारीपर्यंत रात्री एक ते पहाटे चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे जळगावहून रात्री मुंबईकडे जाणाऱ्या हावडा, विदर्भ, पंजाब, कुशीनगर व इतर सुपरफास्ट गाड्यांचा खोळंबा होणार आहे. या गाड्या पुढे सीएसटीला न जाता कल्याणपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Extension to six trains stopping at Jalgaon