शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त इंजीनची तपासणी

By admin | Updated: April 28, 2017 23:59 IST

रेल्वे सेफ्टी कमिशनर चंद्रा यांची पीओएच शेडला भेट : धनबाद येथे झाला होता अपघात

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील पीओएच शेडमध्ये (विद्युत इंजीन कारखाना) दुरुस्तीसाठी आलेल्या कल्याण शेडमधील अपघातग्रस्त डब्ल्यूएजी-9- 31413 या क्रमांकाच्या रेल्वे इंजीनची कमिशनर ऑफ  रेल्वे सेफ्टी (सीआरएस) सुशील चंद्रा यांनी पाहणी   केल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. 31413 या  रेल्वे इंजीनला गेल्या वर्षी धनबाद रेल्वे विभागात मोठा अपघात झाला होता. त्यात इंजीनचे मोठे नुकसान झाले होते. हे इंजीन मुंबई विभागातील कल्याण शेडचे आहे. अपघातानंतर ते डिसेंबर 2016 मध्ये भुसावळ येथील रेल्वे विद्युत कारखान्यात दुरुस्तीसाठी दाखल झाले.तेव्हापासून त्याची दुरुस्ती सुरू होती. त्याची आज चंद्रा यांनी बारकाईने पाहणी केली. प्रसंगी भुसावळ विभागाचे डब्ल्यूएजी-5-23568 या इंजीनसह बोगी, ट्रान्सफॉर्मर आदी विभागांची पाहणी केली. त्यांनी विद्युत इंजीन कारखान्यातील इंजीन दुरुस्तीच्या चांगल्या कामाचे कौतुक केले. त्यांच्यासोबत  डीआरएम आर.के. यादव, एडीआरएम अरुण धार्मिक, विद्युत इंजीन कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक जी. सी. पौनिकर, सिनिअर ईडीपीएम भातो, वरिष्ठ विद्युत अभियंता सारिका गर्ग, सहायक कारखाना व्यवस्थापक आर. एम. श्रीवास्तव, रामफल यादव आदी अधिकारी उपस्थित होते. डब्ल्यूएजी-5-23568 या इंजीनजवळ व्ही. एम.टोपरे, श्याम रणदाळे  आदी हजर होते. डब्ल्यूएजी-9-31413 जवळ डी. जी.सोनवणे, बी.वाय.चौधरी, इ.सी.पात्रो, विवेक ठाकूर, शुभम भदाणे आदी उपस्थित होते.यांनी दिली माहिती  कारखान्यातील वरिष्ठ अनुभाग अभियंता डी.जी. सोनवणे यांनी सेफ्टी रेल्वे कमिशनर सुशील चंद्रा यांना धनबाद येथील अपघातात बिघाड झालेल्या इंजीनमधील तांत्रिक बाबींची माहिती दिली. इंजीनमध्ये काय बिघाड होता हे त्यांनी विस्ताराने सांगितले.