फायनान्स कंपनीला कर्मचार्‍यांचा गंडा

By Admin | Updated: December 22, 2014 14:40 IST2014-12-22T14:40:20+5:302014-12-22T14:40:20+5:30

फायनान्स कंपनीत बोगस ग्राहक दाखवून तसेच ग्राहकांकडून आलेले कर्जाचे पैसे परस्पर लुबाडून तब्बल एक कोटी ७५ लाख ८८हजार रुपयांचा अपहार झाला.

Employees' care to finance company | फायनान्स कंपनीला कर्मचार्‍यांचा गंडा

फायनान्स कंपनीला कर्मचार्‍यांचा गंडा

 नंदुरबार :फायनान्स कंपनीत बोगस ग्राहक दाखवून तसेच ग्राहकांकडून आलेले कर्जाचे पैसे परस्पर लुबाडून तब्बल एक कोटी ७५ लाख ८८हजार रुपयांचा अपहार झाला. याप्रकरणी मेमन फायनान्स कंपनीच्या येथील शाखाधिकारीसह सहा कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इंदूर येथील अँड.मेमन फायनान्स कंपनीचे शाखा कार्यालय नंदुरबारातील गिरिविहार कॉम्प्लेक्समध्ये सुरू होते. कंपनीचे जनरल मॅनेजर धीरज मोहनलाल सोनी यांच्या फिर्यादीवरून शाखाधिकारी कारभारी उत्तम नेरकर, वसुली अधिकारी रमेश जमसू वसावे, रमाकांत गोविंद पाटील, श्रीपाल भोजेसिंग वसावे, प्रकाश टेडग्या वसावे, लेखनिक यशोदा भाईदास गोसावी, सर्व रा.नंदुरबार यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Employees' care to finance company