शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

वीज, पाणी नाही अन निसर्गाचा कोप

By admin | Updated: November 20, 2014 13:31 IST

शेतात पाणी नाही, विजेचा प्रश्न गंभीर असून सतत निसर्गाचा कोप सुरू असल्याने नुकसान सहन करावे लागत असल्याच्या व्यथा पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्यासमोर शेतकर्‍यांनी मांडून मदतीची अपेक्षा केली.

जळगाव/बोदवड/पहूर : शेतात पाणी नाही, विजेचा प्रश्न गंभीर असून सतत निसर्गाचा कोप सुरू असल्याने नुकसान सहन करावे लागत असल्याच्या व्यथा पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्यासमोर शेतकर्‍यांनी मांडून मदतीची अपेक्षा केली. 

जामनेर आणि बोदवड तालुक्यांसह विविध ठिकाणी पालक सचिव देवरा यांनी अधिकार्‍यांच्या ताफ्यासह भेटी दिल्या. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा कृषी अधीक्षक किसन मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, जळगाव प्रांत अधिकारी अभिजित भांडे, भुसावळ प्रांत अधिकारी विजय भांगरे उपस्थित होते. 
बोदवड येथे पीक कापणी प्रयोग पैसेवारीची पाहणी पालक सचिव देवरा यांनी केली.शेलवड शेतशिवारातही ते गेले होते. शेतकर्‍यांच्या व्यथाही त्यांनी जाणून घेतल्या.
शेलवड शिवारातील शेतकरी रघुनाथ मुकुंद जावरे यांच्याशीही देवरा यांनी चर्चा केली. यंदा पावसाने दगा दिल्याने शेतात पीक आहे; पण त्यात दाणेच भरलेले नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. तर शेलवड येथील दीपक माळी यांनी ग्रामस्थांसह अधिकार्‍यांना वीज बिल माफी, तसेच शैक्षणिक फीमाफीची सवलत द्यावी, अशी मागणी केली. 
दुष्काळाची पाहणी
सप्टेंबर महिन्याच्या नजर पीक पाहणीत बोदवड तालुक्याची पैसेवारी ही ५0 पैशांच्या आत असून कापणीनंतर हा तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अधिकारी आले असल्याची माहिती तहसीलदार एस.ए. खैरनार यांनी दिली. पाहणीदरम्यान बोदवड तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी ए.एफ. सरदार, एस.आर. तळेले, ए.आर. निकुंभ, ए.एस.सानप, आर.ए. कागणे, आर.एस. जगताप, बोदवड मंडळ अधिकारी योगेश पाटील व तलाठी, कोतवाल उपस्थित होते.
जामनेरात उत्पादन घटले
कमी पावसामुळे अवर्षणसदृश परिस्थिती जामनेर तालुक्यात निर्माण झाली आहे. यामुळे खरीप हंगाम संपल्यात जमा आहे व शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आला आहे. पहूर येथील रघुनाथ आनंदा पाटील यांनी शेतात बाजरी पीक काढले. पाण्याअभावी एका गुंठय़ाला २ किलो तीनशे ग्रॅम एवढेच उत्पादन झाले असून शासनाच्या धोरणानुसार या ठिकाणी १४ किलो बाजरी उत्पन्न होणे अपेक्षित होते. यांची पाहणी देवरा यांनी केली. विजेच्या प्रश्नासह शेतकर्‍यांच्या कापसाला भाव नाही, कोरडवाहू शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, अशा व्यथा मांडण्यात आल्या. याप्रश्नी शासनाकडे अहवाल पाठविला जाणार आहे. (वार्ताहर)
-------------------
कापूस आणि ज्वारी पिकाची सरासरी उत्पादकता कमी झाल्याची माहिती पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. जामनेर, बोदवड या दोन्ही तालुक्यात पिकांची स्थिती दयनीय आहेच. मात्र इतरही तालुक्यांमध्ये कापूस व ज्वारी पिकाची सरासरी उत्पादकता खूपच कमी आहे. शेतकर्‍यांना काय मदत देण्यात येईल, याबाबत राज्य शासन पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असे देवरा यांनी सांगितले. पीक पाहणीनंतर पालक सचिवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील चारा, पाणीटंचाई, रोहयोची कामे, पीक परिस्थिती, सहकार क्षेत्र याबाबतचा आढावा घेतला. देवरा यांचा दौरा नियोजनाप्रमाणे झाला. पीक पाहणीसाठीही त्यांनी रस्त्यावरच्याच गावांची निवड केली. दोन्ही तालुक्यांमध्ये भीषण परिस्थिती असताना देवरा यांनी दोन तासात दौरा आटोपला.