विजेचा शॉक लागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST2021-07-30T04:17:12+5:302021-07-30T04:17:12+5:30

कळमसरे ता.अमळनेर : शेतातील विद्युत पंपाचा शॉक लागून दिलीप मगन सूर्यवंशी(५७) या शेतकऱ्याचा जागीच ...

Electric shock | विजेचा शॉक लागून

विजेचा शॉक लागून

कळमसरे ता.अमळनेर : शेतातील विद्युत पंपाचा शॉक लागून दिलीप मगन सूर्यवंशी(५७) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.

दिलीप सूर्यवंशी यांची शहापूर रस्त्यालगत शेती आहे. दुपारी आजुबाजूचे शेतकरी मिळून सर्वांनी विहिरीजवळ झाडाखाली जेवण घेतले. दोन महिन्यांपासून पाऊसच नसल्याने विहिरीच्या पाण्यावर लागवड केलेले कापसाचे पीक कोमेजू लागले आहे, त्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करताना विजेचा धक्का बसताच ते खाली कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. शेजारील शेतकरी धावत आले व वीज पुरवठा खंडित केला. याबाबत मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या मोठ्या बहिणीचे कोरोनामुळे जळगावला निधन झाले तर चार वर्षांपूर्वी याच शेतात लहान भावाचे अकस्मात निधन झाले होते. काळाने आज दिलीपवर झडप घातली. संपूर्ण कुटुंबच उद्‌ध्वस्त झाल्याने कळमसरे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Electric shock