शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्री जागे व्हा...जागे व्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील महाविद्यालये त्वरित सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने ...

जळगाव : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील महाविद्यालये त्वरित सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिक्षणमंत्री जागे व्हा, जागे व्हा...शिक्षणमंत्री कॅम्पस खोलो, उदय सामंत एक काम करो, खुर्ची छोडो आराम करो़..., शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणाबाजींनी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून टाकला होता.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १७ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालये बंद आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षाचे निकाल घोषित होऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला. साधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू होतील अशी अपेक्षा होती. पण, महाविद्यालये सुरू झाली नाहीत. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारद्वारे मद्याची दुकाने, मॉल, सिनेमागृह व परिवहन सेवा आणि राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु केल्या आहे, मग महाविद्यालय बंद का? असा प्रश्न उपस्थित करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने महाविद्यालय उघडा आंदोलन मंगळवारी केले.

यांचा होता आंदोलनात सहभाग

सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभाविपच्या आंदोलनाला सुरूवात झाली होती. हातात फलक घेऊन विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात अभाविप जळगाव महानगर मंत्री आदेश पाटील, जिल्हा संयोजक रितेश चौधरी, सहमंत्री कल्पेश पाटील, आंदोलन प्रमुख संकेत सोनवणे, हेमांगिनी पाटील, गौरवी चौधरी, भूमिका कानडे, चिराग तायडे, शुभम शुक्ला, रितेश महाजन, जितेश चौधरी, चैतन्य बोरसे, मयूर अलकरी, ऋतिक माहुरकर, नितेश चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.