शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

वीज खंडित असलेल्या शाळांमध्ये लाखाचे इ-लर्निग कीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 01:06 IST

जि.प.चा सावळा गोंधळ : 48 लाखांचा निधी, बॅटरीचेही वितरण

जळगाव : विद्याथ्र्याचे आयुष्य प्रकाशमान करण्यास लाभदायी ठरू शकणा:या इ-लर्निग यंत्रणा वाटपाबाबत जि.प.मध्ये सावळा गोंधळ उघडकीस आला असून, चक्क वीजपुरवठा नसलेल्या किंवा वीज खंडित केलेल्या जि.प.च्या प्राथमिक शाळांमध्ये 98 हजार रुपये किमतीचे इ-लर्निग कीट वितरित केले जात आहेत.   त्यात जळगाव तालुक्यातील नशिराबाद कन्या शाळा क्र.2, खेडी खुर्द व मोहाडी येथील शाळेत वितरण झाले आहे. त्यातील नशिराबाद व खेडी खुर्द येथील शाळेत वीजच उपलब्ध नाही. जि.प.ने 31 मार्चपूर्वी शिल्लक निधी खर्च करण्यासाठी 48 लाख निधीची तरतूद करून जिल्हाभरातील 15 तालुक्यांमधील 50 जि.प.च्या शाळांमध्ये हे कीट बसविण्यास मंजुरी दिली. हे कीट पुणे येथील पुरवठादाराकडून बसविण्यास सुरुवात झाली आहे. पुरवठादार थेट येऊन ते शाळेत बसवून निघून जातात. ते व्यवस्थित सुरू झाले की नाही, त्यांची गुणवत्ता करारात नमूद केलेल्या बाबींनुसारच आहे की नाही याची खात्री कुठेही झालेली नाही. या कीटमध्ये प्रोजेक्टर, स्पीकर, 1 ली ते 7 वीच्या अभ्यासक्रमाची माहिती असलेले सॉफ्टवेअर आदी यंत्रणेचा समावेश आहे, असे गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण म्हणाल्या. यावल, जळगावात वितरणमागील तीन दिवसात यावल व जळगाव तालुक्यात या कीटचे वितरण झाले. पण विजेअभावी तूर्ततरी या कीटचा कुठलाही उपयोग संबंधित दोन शाळांना नाही. दोन तासांचा बॅटरी बॅकअपइ- लर्निग कीटसोबत दोन तास चालणारी बॅटरी आहे. पण विजेशिवाय या बॅटरीचाही उपयोग नाही. शाळांना व्यावसायिक दरात वीजबिल दिले जात असल्याने थकबाकी वाढून वीजपुवरठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले. इतरत्रही गोंधळजळगावात तीनपैकी दोन शाळांमध्ये वीज उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे, अशातच जिल्हाभरात जेथे मागील काळात इ-लर्निंगचे साहित्य दिले त्यातील अनेक शाळांमध्ये विजेअभावी हे साहित्य पडून आहे. यामुळे शासनाचा निधी वाया जात असल्याची कुरबूर काही शिक्षकांमध्येही आहे. पुण्याचे कर्मचारी आले.. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना विचारले असता इ-लर्निगचे कीट पुणे येथील कर्मचा:यांनी बसविले. याबाबत मुख्यालयातील अधिकारीच सांगू शकतील.