शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यातील ८०० लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST

राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानांतर्गत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झालेल्या तालुक्यातील ८०० लाभार्थ्यांचा ...

राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानांतर्गत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झालेल्या तालुक्यातील ८०० लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश झाला.

पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते शांताबाई निकम (कळमसरे)यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराची किल्ली देण्यात आली.

महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.

येथील पंचायत समिती कार्यालयात सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, माजी उपसभापती श्याम अहिरे, पं.स.सदस्य प्रवीण पाटील, विनोद जाधव, कक्ष अधिकारी के.डी.पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह लाभार्थी इंदुबाई पाटील (निम), अशोक पाटील (निम), नंदू राठोड (सारबेटे खु), प्रवीण कोळी(जैतपीर) उपस्थित होते . सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.

तालुक्यात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राबविलेल्या गेलेल्या या अभियानांतर्गत तालुक्यातील ८०० नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण झाले आहे.

महा आवास अभियानाअंतर्गत तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण ४५० घरकुले अभियान कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आली. राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजना अंतर्गत एकूण ३५० लाभार्थ्यांच्या घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले. राज्यात या अभियान काळात पूर्ण झालेल्या सुमारे ३ लाख २३ हजार घरांचा ताबा संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आला.