शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाचा चोरी गेलेला डंपर अखेर २0 तासातच सापडला!

By admin | Updated: December 4, 2014 15:13 IST

तालुक्यातील फागणे शिवारातील गोडावूनमधून वॉचमनला मारहाण करून चोरून नेलेला डंपर २0 तासात वैजापूर (जि. औरंगाबाद) येथे सापडला.

धुळे : तालुक्यातील फागणे शिवारातील गोडावूनमधून वॉचमनला मारहाण करून चोरून नेलेला डंपर २0 तासात वैजापूर (जि. औरंगाबाद) येथे सापडला. डंपरमालक नगरसेवकानेही स्वत: पथके तयार करून डंपरचा शोध सुरू केला होता. 

शहरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक शेलार यांचे फागणे शिवारात हॉटेल शीतलमागे सेंट्रिंगचे साहित्य ठेवण्याचे गोदाम आहे. बुधवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास गोदामात पांढर्‍या रंगाची कार व एका दुचाकीने सहा ते सात जण आले. त्यातील काहींनी वॉचमन किसन पुंडलिक भिल याला मारहाण व दमदाटी करून बाजूला नेले. तसेच चोरट्यांनी तलवार काढून ती भिल यांच्या मानेवर लावून आरडा-ओरड केली तर ठार मारू, अशी धमकीही वॉचमनला चोरट्यांनी दिली.. त्यामुळे भीतीने भिल यांनी गोडावूनची किल्ली चोरट्यांना दिली. त्यानंतर चोरट्यांनी तेथे उभा असलेला डंपर (क्र. एमएच १८ एए. ७६५0) हा पळवून नेला. 
वॉचमनने सांगितली माहिती
चोरट्यांनी डंपर पळविल्यानंतर वॉचमन किसन भिल यांनी घडलेला प्रकार नगरसेवक दीपक शेलार यांना सांगितला. शेलार यांनी लागलीच तालुका पोलीस ठाणे गाठून डंपर चोरीची माहिती दिली. मात्र त्यांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात आले. 
पथके केली तयार
नगरसेवक दीपक शेलार यांनी पोलिसांवर अवलंबून न राहता रात्री मित्र मंडळी, नातेवाईक व इतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना माहिती दिली आणि स्वत: पाच पथके तयार करून ते साक्री, जळगाव, औरंगाबाद, नाशिक येथे रवाना करण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेजमुळे माहिती
नगरसेवक दीपक शेलार यांनी त्यांच्या गोडावूनला लागून असलेल्या मोठय़ा दुकानाला बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. त्यात रात्री २.१५ वाजता डंपर घेऊन जाताना चोरटे फुटेजमध्ये दिसून आले. तसेच डंपर लळींग टोल नाक्यावरून रात्री २.३0 वाजता पास झाल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. 
नागरिकांमध्ये घबराट
दरम्यान शहरासह जिल्ह्यात चोरी, घरफोडी, लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. असे असतानाही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. या घटनांमुळे नागरिकांसह वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आपली गस्त वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
 
 ..आणि नंबरप्लेट बदलताना डंपर सापडला 
■ डंपर घेऊन चोरटे वैजापूर (जि. औरंगाबाद) येथे पोहचले. तेथे चोरट्यांनी बुधवारी दुपारी डंपर रस्त्याच्या कडेला लावला होता. तेथे चोरट्यांच्या सहकार्‍यांनी बनावट नंबरप्लेट आणल्या होत्या. डंपर एच १८ क्रमांकाची नंबरप्लेट काढून चोरटे एमएच १२ क्रमांकाची नंबरप्लेट लावत असताना एका सुज्ञ नागरिकाच्या लक्षात आले. त्याने मित्राद्वारे वैजापूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस तत्काळ घटना स्थळी दाखल झाले आणि पोलीस वाहन पाहताच चोरट्यांनी डंपर सोडून पळ काढला. नगरसेवक दीपक शेलार यांनी तेथे जाऊन पोलिसांना डंपरची कागदपत्रे दाखवून डंपर ताब्यात घेतला. अखेर अवघ्या १५ ते २0 तासात चोरी गेलेला डंपर सुज्ञ नागरिक, वैजापूर पोलीस व नगरसेवकाच्या मदतीमुळे सापडला.