शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अहंमपणामुळे राज्यातली सत्ता गेली, पण अहंमपणा गेला नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

जळगाव : कार्यकर्ते आपल्याला सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून हे सरकार पडणार आहे, आपण सत्तेत येणार आहोत, असे ...

जळगाव : कार्यकर्ते आपल्याला सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून हे सरकार पडणार आहे, आपण सत्तेत येणार आहोत, असे विरोधकांना सांगावे लागत आहे. मात्र, आपल्या सरकारचे ५ वर्षे आरामात पार पडतील. यांना ‘पुन्हा येईल, पुन्हा येईल’ करतच रहावे लागेल. यांच्या अहंमपणामुळे भाजपची राज्यातून सत्ता गेली. पण, अहंमपणा अजूनही गेलेला नाही, असा टोला एकनाथ खडसेंनी भाजपसह देवेंद्र फडणवीसांना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ११ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हा बैठक बुधवारी दुपारी पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना एकनाथ खडसे बोलत होते. खडसेंनी यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन करताना विरोधकांना चिमटे काढले.

एकजुटीने काम करावयाचे आहे

वर्तमानपत्रात कधी काही आले तर पॅनिक होऊ नका. वर्तमानपत्रात कधी चांगले तर कधी वाईट येते. वर्तमानपत्रात कधी काय येते, याचा मला गेल्या ४० वर्षांत चांगला अनुभव आहे. आपलं काम सोडू नका. आपल्याला एकजुटीने काम करायचे आहे, असेही खडसे म्हणाले. त्यानंतर अरुणभाई गुजराथी यांनी मार्गदर्शन केले. हे सरकार पाच वर्षे टिकरणार असून सर्वांनी एकत्र येवून काम करायचे आहे. राजकारण घडू शकते पण घडविण्याची क्षमता पाहिजे, असे ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती

या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजीमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, गफ्फार मलिक, अरुण पाटील, दिलीप वाघ, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.