शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे विकासासाठी निवृत्तांनी प्रगल्भ अनुभवाची जोड द्यावी - डीआरएम

By admin | Updated: June 17, 2017 13:15 IST

रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत 87 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचा:यांचा डीआरएम यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ऑनलाईन लोकमतभुसावळ , जि. जळगाव, दि. 17 -  रेल्वेतून  सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा:यांच्या गाठीशी दीर्घ  अनुभव आहे. त्यांनी त्याचा रेल्वेच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन भुसावळचे डीआरएम आर.के.यादव यांनी शनिवारी केले. रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत 87 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचा:यांचा डीआरएम यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.असोसिएशनचे पेट्रन एस. ओ. ब:हाटे अध्यक्षस्थानी होते. आजच्या सत्काराने सेवानिवृत्त वयोवृद्ध कर्मचारी  भारावून गेल्याचे चित्र होते.सेवानिवृत्तांनी त्यांचा अनुभव रेल्वेच्या कामासाठी वापरल्यास त्याचा चांगला फायदा होईल, असेही यादव यावेळी बोलताना म्हणाले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रसंगी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष व्ही.के.समाधिया यांनी मनोगत व्यक्त केले.पेन्शन प्रकरणांचा निपटारावरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.तुषाबा शिंदे यांनी बोलताना सांगितले की, डीआरएम यादव यांच्या सूचनेनुसार सेवानिवृत्तांच्या पेन्शन बाबतची प्रकरणे तातडीने मार्गी लावली जात आहेत. दोन वर्षात 450  प्रकरण होती ती आता 90 राहीली आहेत. ती पंधरा दिवसात पूर्ण होतील. काहीही अडचण असल्यास ती सोडविली जाईल,असे सांगितले.व्यासपीठावर  बी.एम.नन्नवरे, असोसिएशनचे अध्यक्ष पी.जे.जावळे, व्ही.के.समाधिया, सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय सचिव एस. बी. पाटील उपस्थित होते. प्रसंगी अनेक सेवानिवृत्तांनी असोसिएशनला आर्थिक सहकार्य केले.  असोसिएशनच्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली ती अशी-अध्यक्ष पी.जे.जावळे, उपाध्यक्ष बी.एम.नन्नवरे, आर. एल. पाटील, सचिव मंजूर अहमद, कोषाध्यक्ष एन.आर.सरोदे, सहाय्यक सरचिटणीस पी.बी.जावळे.सदस्य एस.आर.पांडे, एस.टी.नाथ,पी. आर. येवले, व्ही. व्ही. राजपाठक, ए. एम. रायसिंघानी, बी.पी.भंडारी, व्ही.पी. चतूर, सी.डी.पाटील, एस.बी.भांबरे, बी.आर.सरोदे,व्ही.ए.जावळे.पेट्रन एस.ओ.ब:हाटे.रेल्वे कामकाजात सुधारणासाठी सूचना पाठवा सेवानिवृत्त वयोवृद्ध रेल्वे कर्मचा:यांचा सन्मान करताना रेल्वे प्रशासनाला अतीव आनंद होत आहे,अशी भावना डीआरएम आर.के.यादव यांनी व्यक्त केली. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, अनुभवी कर्मचा:यांचा मला गौरव करता आला.सेवानिवृत्त कर्मचा:यांबाबत रेल्वे प्रशासनाला आदर आहे,असेही यादव म्हणाले.सेवानिवृत्तांची कोणतीही समस्या असली तरी ती तातडीने सोडविण्यात येईल विशेष करुन पेन्शन बाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल.आरोग्याचे प्रश्नही सोडविण्यात येतील. प्रशासनाला सेवानिवृत्तांना अधिक सुविधा देण्यावर भर राहील.सेवानिवृत्तांनी  रेल्वेच्या कामकाजात  सुधारणा करण्याबाबत सूचना कराव्या असेही आवाहन त्यांनी केले.