नशिराबादला कुत्र्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:19 IST2021-09-26T04:19:21+5:302021-09-26T04:19:21+5:30

नशिराबाद : येथे गेल्या काही दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिक धास्तावले आहेत. मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त ...

Dogs flock to Nasirabad | नशिराबादला कुत्र्यांचा धुमाकूळ

नशिराबादला कुत्र्यांचा धुमाकूळ

नशिराबाद : येथे गेल्या काही दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिक धास्तावले आहेत. मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नगर परिषदेने याबाबत दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. परिसरातील शहरातून पकडलेली मोकाट कुत्री महामार्गालगत सोडण्यात येतात आणि त्याचा त्रास नशिराबाद येथील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे तर नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन अनेकांचा लचका तोडला आहे. काहींना तर गंभीर दुखापतीस सामोरे जावे लागले आहे. पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ यामुळे नागरिक धास्तावले आहेत. मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. गावातील वाढत्या समस्यांबाबत कुणी दखल घेणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Web Title: Dogs flock to Nasirabad