दिव्यांग बांधवांना त्वरित लाभ मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST2021-02-05T05:58:08+5:302021-02-05T05:58:08+5:30

जळगाव : विश्वरत्न दिव्यांग बहुउद्देशिय संस्थेची सभा नुकतीच शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात पार पडली.यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अशोक बाविस्कर होते़.त्यांनी ...

Divyang brothers should get immediate benefits | दिव्यांग बांधवांना त्वरित लाभ मिळावा

दिव्यांग बांधवांना त्वरित लाभ मिळावा

जळगाव : विश्वरत्न दिव्यांग बहुउद्देशिय संस्थेची सभा नुकतीच शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात पार पडली.यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अशोक बाविस्कर होते़.त्यांनी शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवाना मार्गदर्शन केले़ त्यानंतर उपस्थितांच्या समस्या जाणून घेवून शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत लाभ मिळाला नाही, अशांना त्वरित लाभ मिळावा, असा ठराव पारित करण्यात आला. दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्य न झाल्यास ८ तारखेला आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा सभेत देण्यात आला. यावेळी गोविंद देवरे, योगेश कोळी, गणेश पाटील, अरूण पाटील, शाकीर खान, नितीन नारखेडे, अमोल विसपूते, शब्बीर खान, मोहम्मद खान, लहानू पवार, रौनक अली, मधुराबाई चव्हाण, युवराज सपकाळे, नारायण सोनवणे, सुभाष पाटील, भरत सपकाळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Divyang brothers should get immediate benefits