शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

भक्तीगीत, गवळणीतून नृत्याविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:39 PM

‘अनोख्या अनुभूती’ने जिंकली मने : प्रभाकर संगीत कला अकादमीतर्फे आयोजन

जळगाव : भजन, भक्तीगीत, गवळण अशा विविध प्रकारातील उपशास्त्रीय गायन शैलीवर आधारीत सादर करण्यात आलेल्या नृत्याविष्काराने शहरवासीयांची रविवारची संध्याकाळ संस्मरणीय ठरली. निमित्त होते, मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे प्रभाकर संगीत कला अकादमीच्यावतीने आयोजित ‘एक अनुभव नृत्याविष्काराचा’ या कार्यक्रमाचे.यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, रायसोनी इंस्टिट्यू आॅफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, अकादमीच्या संचालिका डॉ. अपर्णा भट-कासार, किरण कासार यांची प्रमुख उपस्थिती होती.तेजस मराठे, राधिका सरोदे (तबला), कपिल शिंगाणे, शिवानी जोशी (संवादिनी), कोमल चौव्हाण (पढंत) यांनी साथसंगत केली. कोमल चौव्हाण, मृणाल सोनवणे, राधिका सरोदे, शिवानी जोशी, ऋतुजा महाजन, हिमानी पिले, मृण्मयी कृलकर्णी, सानिका कानगो या अकादमीतील वरिष्ठ विद्यार्थिंनी डॉ.अपर्णा भट-कासार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची नृत्य रचना केली होती. यावेळी डॉ. प्रीती अग्रवाल म्हणाल्या की, डॉ. अपर्णा भट-कासार यांच्या अकादमीच्या पहिल्या बॅचमध्ये माझी कन्या विद्यार्थिनी होती, असे सांगत त्यामुळेच डॉ. अपर्णा भट यांची कथ्थक क्षेत्रातील तपश्चर्या व साधनेची मी एक साक्षीदार असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन मृणाल सोनवणे व राधिका सरोदे यांनी केले तर भाग्यश्री पाटील हिने आभार मानले. प्रास्ताविक हिमानी पिले यांनी केले तर मधुरा इंगळे यांनी परिचय करून दिला. स्वाती पाटील, कपील शिंगाणे, तेजस मराठे, विजय टेलर, रुपेश महाजन, मिलिंद थत्ते, विजय डोहोळे, समीर दीक्षित, भूषण जोशी यांचा सत्कार करण्यात आला.नृत्य कलावंतांचे बहारदार सादरीकरणगणेश वंदना व पारंपारिक कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आरोही सोले, भाग्यश्री पाटील, भार्गवी खैरनार, मधुरा इंगळे, मानसी वाणी, पूर्वा कुलकर्णी, भावना सुलक्षणे, तेजस्वीनी क्षिरसागर, तनवी बागुल, स्वानंदी बोरसे, शर्मीष्ठा पाटील, रिद्धी सोनवणे, प्रणिता पवार, दीपश्री जाधव, अपूर्वा पाटील, आयुश्री दशपुत्रे, आनंदी याज्ञिक, आर्या सराफ, दिक्षा चौधरी, गौरी वाठ, जान्हवी पाटील, कस्तुरी नंदर्षी, नुपूर मगर, पूर्वा झारे, सिद्धी राणे, वृषाली झांबरे, स्वरा नेहते, संस्कृती गवळे, वैदेही चौधरी, समिक्षा सोनवणे या विद्याथीर्नींनी भजन, भक्तीगीत, तराणा, गवळण इत्यादी उपशास्त्रीय गायन शैलीवर आधारीत नृत्य सादर केले. या बहारदार सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव