शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विकास प्रकल्प : जिल्हा प्रशासनाची समिती नेमणार जमीन खरेदीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना

By admin | Updated: August 25, 2015 22:12 IST

सिंचन व इतर प्रकल्पांसाठी लागणारी खासगी जमीन थेट खरेदी करण्याचा अधिकार आता शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिला आहे.

सिंचन व इतर प्रकल्पांसाठी लागणारी खासगी जमीन थेट खरेदी करण्याचा अधिकार आता शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिला आहे. त्यामुळे आता शासन शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पाटबंधारे व इतर प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होण्यास बराच कालावधी जातो. परिणामी प्रकल्प रेंगाळतो. पर्यायाने त्याचा लाभ लाभधारकांना मिळण्यास विलंब होतो. तसेच प्रकल्पाची किंमतदेखील वाढते. याशिवाय केंद्रशासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यान्वये मिळणारा मोबदला आणि राज्यशासनामार्फत देण्यात येणारा मोबदला यात मोठी तफावत असल्याने शेतकरी जमीन देण्यासाठी संभ्रमावस्थेत असतात. या बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाने सिंचन व इतर प्रकल्पांसाठी लागणारी खासगी जमीन थेट खरेदी करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी जमीन खरेदी करताना ती प्रकल्पासाठीच खरेदी करण्यात यावी. बुडीत क्षेत्र, मुख्य कालवे, वितरिका याकरिता जमिनी थेट खरेदीने घ्याव्यात. तसेच अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याकरिता भूसंपादन प्रक्रिया न राबविता आवश्यक जमीन सलग थेट खरेदीने घ्याव्यात, असेही या अध्यादेशात नमूद केले आहे.पूर्वी शासन प्रकल्पासाठी लागणारी शेतकऱ्यांची खासगी जमीन भूसंपादन प्रक्रिया अन्वये खरेदी करीत असे. त्यामुळे त्यास कायद्याचा अडसर होता. परंतु आता थेट जमीन खरेदी करणार असल्याने कायदा आड येणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचन प्रकल्पांच्या नावावर हडपण्याचा शासनाचा डाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.