Depriving students of scholarships | शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित
शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

जळगाव- राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेपासून जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी वंचित असल्याची बाब समोर आली असून याबाबत शिक्षण विभागातही तक्रार देण्यात आली आहे़
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुर्ण यांच्या मार्फ इयत्ता आठवीसाठी राष्ट्री आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते़ दरम्यान, शहरातील काही विद्यार्थ्यांनी आठवीमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण करून पात्र ठरूनही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत़ ही परीक्षा पात्र ठरल्यानंतर विद्यार्थ्यांना नववीपासून शिष्यवृत्ती दिली जाते़ मात्र, नववीत तर नव्हे दहावीची परीक्षा नजीक आली असताना सुध्दा अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही़ याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण विभागात याबाबत माहिती दिली असून लोकमतकडेही याबाबत माहिती देऊन त्वरित शिष्यवृत्ती शासनाकडून मिळावी अशी मागणी केली आहे़

Web Title: Depriving students of scholarships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.