निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST2021-04-22T04:17:15+5:302021-04-22T04:17:15+5:30

असोदा : नूतन मराठा विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक मधुकरराव पाटील (बाविस्कर) (८३) यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

असोदा : नूतन मराठा विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक मधुकरराव पाटील (बाविस्कर) (८३) यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रेस फोटोग्राफर चित्रनिश पाटील यांचे वडील होत.

--

जनाबाई पाटील

जळगाव : जनाबाई पाटील (७४, रा.खोटेनगर,विठ्ठलवाडी) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अर्जुन पाटील यांच्या त्या पत्नी होत.

--

मीराबाई पाटील

जळगाव : मीराबाई पाटील (७५, रा.टागोरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. प्रवीण हेमंत पाटील यांच्या त्या आई होत.

--

गंगाधर मालुसरे

जळगाव : गंगाधर मालुसरे (८४, रा.शाहू नगर) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रेल्वे कर्मचारी दिलीप मालुसरे यांचे ते वडील होत.

--

प्रा.डॉ.रवींद्र पाटील

चोपडा : प्रा.डॉ.रवींद्र पाटील (६०, रा.मल्हारपुरा) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. बाळकृष्ण सोनवणे (पाटील) यांचे ते बंधू होत.

--

तुकडू वानखेडे

जळगाव : पश्चिम रेल्वेमधील सेवानिवृत्त स्टेशन अधीक्षक तुकडू वानखेडे (रा.शाहू नगर) यांचे निधन झाले. सा.बां.विभागातील शाखा अभियंता दिलीप वानखेडे यांचे ते वडील होत.

--

प्रभाकर चौधरी

जळगाव : प्रभाकर चौधरी (रा.रामेश्वर कॉलनी) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

--

Web Title: Death talk