शिरसोली येथील दक्षेश्वर महादेव उत्सव कोरोनामुळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:16 IST2021-03-05T04:16:45+5:302021-03-05T04:16:45+5:30

शिरसोली प्र.बो. येथे हिंदू मुस्लीम एकतेचे दर्शन घडविणारा दक्षेश्वर महादेव सप्ताह हा शिवरात्रीच्या सात दिवस आधी दि. ५ मार्चला. ...

Daksheshwar Mahadev festival at Shirsoli canceled due to corona | शिरसोली येथील दक्षेश्वर महादेव उत्सव कोरोनामुळे रद्द

शिरसोली येथील दक्षेश्वर महादेव उत्सव कोरोनामुळे रद्द

शिरसोली प्र.बो. येथे हिंदू मुस्लीम एकतेचे दर्शन घडविणारा दक्षेश्वर महादेव सप्ताह हा शिवरात्रीच्या सात दिवस आधी दि. ५ मार्चला. सुरू होणार होता. या सात दिवसांच्या सप्ताहात अखंड भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाशिवरात्रीला दक्षेश्वर महादेवाची संपूर्ण गावातून टाळ मृदंगासह भव्य अशी मिरवणूक निघत असते. या मिरवणुकीसह महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही गावासह पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लीम या उत्सवात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. या कार्यक्रमाला भाविकांची गर्दी उसळत असते. या गर्दीमुळे कोरोनाचा अधिक संसर्ग वाढू नये म्हणून येथील ग्रामस्थांसह आयोजकांनी यंदाचा दक्षेश्वर महादेवाचा सात दिवसांचा उत्सव रद्द करण्याचे ठरविले आहे. परंपरेत खंड पडू नये म्हणून फक्त सप्ताहाची मांडणी होणार आहे. तरी भाविक भक्तांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Daksheshwar Mahadev festival at Shirsoli canceled due to corona