दरोडय़ापूर्वीच पाच संशयित आरोपी जाळ्यात

By Admin | Updated: May 29, 2017 17:03 IST2017-05-29T17:03:21+5:302017-05-29T17:03:21+5:30

शाहपूर येथे दोन बंदुकीसह दरोडय़ाचे साहित्य जप्त

Before the dacoity, five suspects were trapped | दरोडय़ापूर्वीच पाच संशयित आरोपी जाळ्यात

दरोडय़ापूर्वीच पाच संशयित आरोपी जाळ्यात

ऑनलाईन लोकमत

ब:हाणपूर, दि.29- दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या अट्टल पाच संशयित आरोपींना शाहपूर पोलिसांनी पकडल़े आरोपींच्या ताब्यातून दरोडय़ाच्या साहित्यासह दोन बंदुक जप्त करण्यात आल्या़ सर्व आरोपी शाहपूर येथील रहिवासीत आहेत़
शाहपूर क्षेत्रातील जंबूपानीजवळ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींना पकडण्यात आल़े शाहपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाठक यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली़ 
पोलिसांच्या कारवाईत साईदास उर्फ सांई जोधाराम बंजारा (21),  राजा उर्फ राजेश छगन (20),  शेख भूरा शेख बशीर (33), संतोष ज्ञानेश्वर (22), हिरालाल गुलाब (35) यांना अटक करण्यात आली़ आरोपींच्या ताब्यातून दोन बंदुकांसह लोखंडी रॉड तसेच पाईप, चाकू तसेच पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या़ आरोपींविरुद्ध  शाहपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ 

Web Title: Before the dacoity, five suspects were trapped