जळगाव : जिल्हा एकता मराठा फाऊंडेशनतर्फे २० ते २४ जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय मराठा क्रिकेट लिग स्पर्धेचे आयोजन केले असून, बुधवारी सायंकाळी ६ वाजता शिवतीर्थ मैदानावर पाचोरा येथील डॉ. भूषण मगर पाटील व मुक्ताईनगर येथील उद्योजक विनोद सोनवणे यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष गोपाल दर्जी यांनी बुधवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच या स्पर्धेच्या समारोपाला आमदार रोहित पवार येणार असल्याचेही दर्जी यांनी सांगितले.दर्जी फाऊंडेशनच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला डॉ. भूषण मगर पाटील, एकता मराठा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंभू सोनवणे, सचिव सागर पाटील, खजिनदार जयांशु पोळ, सदस्य सचिन पाटील, नीलेश पाटील, चंद्रशेखर पाटील, सुनील सोनवणे व दिपक आर्डे उपस्थित होते. यापुढे दर्जी यांनी सांगितले की, बुधवारी या उद्घाटनासोबत सर्व समाजातील गरजू विद्यार्थांना स्पर्धापरिक्षांचे कीट देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी तालुक्यातील १५ संघ व शहरातील ५ असे एकूण २० संघांचा सहभाग असणार आहे. समारोपाला आमदार रोहित पवारांच्या ५१ दिव्यांग बांधवांना व्हील चेअरही वाटप करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
एकता मराठा फाऊंडेशनतर्फे आजपासून क्रिकेट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:17 IST
जळगाव : जिल्हा एकता मराठा फाऊंडेशनतर्फे २० ते २४ जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय मराठा क्रिकेट लिग स्पर्धेचे आयोजन केले असून, ...
एकता मराठा फाऊंडेशनतर्फे आजपासून क्रिकेट स्पर्धा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}