शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गायीची चोरी; मायलेक झाले पोरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

हरताळा, ता. मुक्ताईनगर : पेरण्या ऐन तोंडावर आल्या असता येथील बसस्थानकाजवळील जलकुंभालगतच असलेल्या खळ्यातून धोंडू बाबूराव चोपडे यांच्या ...

हरताळा, ता. मुक्ताईनगर : पेरण्या ऐन तोंडावर आल्या असता येथील बसस्थानकाजवळील जलकुंभालगतच असलेल्या खळ्यातून धोंडू बाबूराव चोपडे यांच्या मालकीचा एक गोऱ्हा व भारत बाबूराव चोपडे यांच्या मालकीच्या गायीची सोमवारी रात्री चोरी झाली. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी ही गाय व्यालेली होती. वासराची माय पोरकी झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

पशुपालकांवर संकट

पेरण्या तोंडावर असताना त्यातच पशुपालकांवर मोठे संकट कोसळले आहे. यापूर्वीदेखील चोरीला पशुधन जाण्याच्या घटना घडत असल्याचे पशुपालकांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये चोरट्यांचे भले होत असून, पोटच्या गोळ्यापेक्षाही जिवापाड प्रेम करणारे पशुधन चोरी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

नेहमी चोरीच्या घटना या ठरलेल्या आहेत. मागील वर्षीदेखील अशाच लॉकडाऊनच्या काळात दोन म्हशी व एकाची बैलजोडी चोरीला गेली होती. त्यांचाही शोध लागला नसल्याचे त्यांनी सांगितले.

गुरांचे बाजारही बंद

ऐन पेरणीच्या तोंडावर पशुधन चोरीला जात आहे. त्यात गुरांचे बाजारही बंद आहेत. त्यात गुपित व्यवहार करण्यासाठी भुरट्या चोरट्यांना चांगलेच फावत आहे. चोरट्यांचा छडा लावण्यासाठी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा पशुपालकांसह गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोभेची वस्तू

गावाच्या मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून तेही शोभेची वस्तू ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पशुधन चोरीला जात असल्यामुळे यात तथ्य असल्याचा आरोपही केला जात आहे.

चोरी रोखण्यासाठी लोकसहभाग आवश्यक

गावाच्या दर्शनी भागात जवळच असलेल्या ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत. चोरट्यांना आळा बसण्यासाठी लोकसहभागासह गस्त घालण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गाय-वासरू पोरके

चोरीला गेलेल्या गायीने पाच दिवसांपूर्वी येथील गोठ्यात एका वासरीला जन्म दिला होता. रात्रीच्या घटनेने पाच दिवसांच्या वासरीवर निर्दयी भुरट्या चोरांनी घाला घातल्यामुळे माय-लेकींना एकमेकींना पोरक्या झाल्या आहेत.