शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्याला भरधाव कारने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 13:04 IST

जळगाव : शहराकडून एरंडोलकडे जात असलेल्या दुचाकीला धुळ्याकडून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने शंकर रामदास गुंजाळ (५०) व ...

जळगाव : शहराकडून एरंडोलकडे जात असलेल्या दुचाकीला धुळ्याकडून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने शंकर रामदास गुंजाळ (५०) व त्यांची पत्नी वैशाली शंकर गुंजाळ (४५ रा. मुसळी, ता. धरणगाव) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता महामार्गावरील एकलग्न गावापासून काही अंतरावर पेट्रोल पंपाजवळ झाला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर व वैशाली गुंजाळ हे पती-पत्नी रविवारी आपले काम आटोपून पाळधीकडून दुचाकीने (एम.एच.१९ ए. एल.५७४०) घराकडे जात असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येत असलेल्या कारने (एम.एच.०५ डीएच४१८५) एकलग्न गावाजवळ दुचाकीला धडक दिली. त्यामुळे गुंजाळ दाम्पत्य दुचाकीवरुन फेकले गेले.दोघांच्या हातापायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनी तातडीने जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. घटनास्थळी पाळधी पोलिसांनी धाव घेतली. अपघातग्रस्त कार व दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. कार चालकाचे नाव उशिरापर्यंत उपलब्ध झाले नसल्याची माहिती पाळधी पोलिसांनी दिली.सलग दुसºया दिवशी अपघात, चार जखमीमहामार्गावर सलग दोन दिवसापासून अपघात होत आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाळधी बायपासवर राजाराम भास्कर भालेराव व त्यांचा मुलगा या पिता-पूत्राच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली होती. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील आठवड्यातही या महामार्गावर जैन कंपनीजवळ अपघात झाला होता._- वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताच्या घटनांमध्ये आणखी चार जण जखमी झाले आहेत. चौघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये प्रफुल्ल नागराज (२८ खेडी), गफूर शेख (२५, ख्वॉजानगर), कल्पेश मोरे,(२८,जळगाव) व गायश्री पाटील (११, नशिराबाद) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव