शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
3
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
4
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
5
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
8
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
9
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
10
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
11
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
12
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
13
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
14
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
15
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
16
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
17
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
18
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
19
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
20
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 13:01 IST

जळगाव : जळगावात शनिवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. येथील एका ४९ वर्षीय इसमाला कोरोना झाल्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी उशिरा आरोग्य ...

जळगाव : जळगावात शनिवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. येथील एका ४९ वर्षीय इसमाला कोरोना झाल्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी उशिरा आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे.
जळगावात राहणारा हा इसम दोन दिवसापूर्वीच मुंबईहून आला आहे. मुंबईत तो एका चारचाकीवर चालक म्हणून काम करतो. घशात त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी दुपारी त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तिथे त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तो काही दिवस दुबई येथे होता, अशी चर्चा आहे.
जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी तीन जण संशयित म्हणून दाखल झाले होते. त्यात या ४९ वर्षीय इसमाचाही समावेश होता. शुक्रवारी दाखल झालेल्या उर्वरित दोघांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण सापडल्याने जळगावात मोठीच खळबळ उडाली आहे.

सील केलेल्या कक्षात उपचार
दरम्यान, या कोरोनाग्रस्त रुग्णावर जिल्हा रुग्णालयातील नेत्रकक्षात पॉझिटीव्ह रुग्णांसाठीच्या स्वतंत्र कक्षात उपचार सुरु आहेत. हा कक्ष पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

पॉझीटीव्ह असलेला हा रुग्ण जळगावातील मेहरुण परिसरातील रहिवासी आहे. त्यामुळे हा भाग सॅनेटाईज करण्यात येईल. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाही १४ दिवस कोरोना कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात येईल.
- एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव.

पॉझीटीव्ह अहवाल आलेला हा रुग्ण मुंबईहून परतला आहे. त्याची आणखी माहिती घेतली जात आहे.
- डॉ. भास्कर खैरे, डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. जळगाव.