शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थेच्या कजर्दार महिलेस सशर्त जामीन

By admin | Updated: April 11, 2017 00:22 IST

सर्वस्तरातून अटकेचा निषेध : राजकीय दबावाची चर्चा, न्यायालयात गर्दी

जामनेर :  सुरेशदादा जैन पतसंस्थेच्या कजर्दार महिला सरोज पवन राका यांना पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्या.एस.एम.ए. सैयद यांनी जामीन मंजूर केला असून, प्रत्येक रविवारी पोलीस ठाण्यात येऊन हजेरी देण्याचे आदेश दिले.पतसंस्थेने बेकायदेशीर, विनातारण व आवाक्याबाहेर कर्ज दिले, कजर्दारांनी वेळेवर कर्ज फेडले नाही, अशा स्वरूपाची तक्रार अॅड. कृष्णा बनकर व इतर तिघांनी सहायक निबंधक व पोलिसांकडे 10 महिन्यांपूर्वी केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली. तद्नंतर लेखापरीक्षक दीपक अट्रावलकर यांच्या फिर्यादीवरून 18 संचालकांसह 15 कजर्दार व पतसंस्थेतील शाखा व्यवस्थापक अशा 35 जणांवर 29 जुलै 2016 रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज मंजूर झाल्यानंतर संचालक मंडळाने याचिकेद्वारे हा गुन्हा राजकीय दबावाखाली व आकसापोटी असल्यामुळे एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच कजर्दारांनीदेखील आम्ही थकीत रक्कम भरल्याने आमच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. याचिकेचा निकाल लागेर्पयत पोलिसांचा तपास मध्यंतरी थंडावला होता. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने यातील काही याचिका फेटाळल्या, तर काहींनी आपल्या याचिका मागे घेतल्या.आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर फिर्यादी अट्रावलकर यांच्या घेतलेल्या जबाबानुसार रविवारी सरोज पवन राका या कजर्दार महिलेस अटक केली. ही अटक नेमकी महावीर जयंतीदिनी झाल्याने जैन समाज बांधवांमध्ये संताप निर्माण झाला. राका यांच्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी रात्री जैन समाजातील सर्व महिला मंगल कार्यालयात सुरू असलेले धार्मिक कार्यक्रम सोडून पोलीस ठाण्यात पोहोचल्या. अहिंसक मार्गाने निषेध करीत समाज बांधवांनी पोलीस ठाणे आवारात णमोकार मंत्राचा जप सुरू केला. उशिरा रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड येथे आल्यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन केली गेलेली अटकेची कारवाई अयोग्य असल्याचे सांगितले. मात्र पोलीस अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने रात्री दीड वाजता जमाव माघारी परतला.कजर्दार महिला सरोज राका यांच्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी रात्री राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका:यांनी ही कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा आरोप केला होता. सोमवारी दिवसभर याचीच शहरात चर्चा सुरू होती. ही कारवाई कुणाच्या सांगण्यावरून झाली, हे सर्वश्रुत आहे.  पोलिसांवर राजकीय दबाव कुणाचा याची चर्चा सुरू होती.महावीर जयंतीच्या पवित्र दिनी धार्मिक कार्यक्रम सुरू असताना महिलेस किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यात अटक करणे अयोग्य आहे. राजकीय दबावाखाली झालेल्या या कारवाईचा निषेध करतो.-प्रा.शरद पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, जामनेरअल्पसंख्याक समाजाच्या महिलेवर गुन्हा दाखल होताच अटकेची कारवाई करणा:या पोलिसांनी या प्रकरणातील मोकाट फिरणा:यांना अटक करण्याची हिंमत दाखवावी. राजकीय दबावाखाली होत असलेली कारवाई निषेधार्थ असून, पोलीसदेखील दबावाखाली काम करीत असल्याचे स्पष्ट झाले.              -प्रदीप लोढा, जि.प. माजी सदस्य, पहूरहा प्रकार नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न होता. परंतु आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता. शेवटी सत्याचा विजय झाला.     -पवन मूलचंद राका (कजर्दार महिला सरोज राका यांचे पती)