शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य नियुक्तीबाबत कुलपतींकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतीच दोन अधिष्ठांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदावर नियुक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतीच दोन अधिष्ठांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदावर नियुक्ती करण्‍यात आली आहे. दरम्यान, ही नियुक्ती नियमबाह्य असून संबंधित व्यक्ती त्या पदासाठी पात्र नसल्याचा आरोप जिल्हा एनएसयुआयचे जिल्हाध्‍यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे. या नियुक्ती सदंर्भात त्यांनी कुलपती व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.

शहादा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य राजेंद्र पाटील व धुळ्यातील पालेशा महाविद्यालयाचे प्राचार्य पी.पी.छाजेड यांची नुकतीच विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन परिषद सदस्य पदाची पात्रता ही सदस्य हा विद्यापीठाचा अधिष्ठाता तसेच पूर्णकालीन वेतन अधिकारी असावा लागतो. पण, नियुक्तीची ही प्राथमिक अट सुध्दा नियुक्त झालेल्या सदस्यांकडे नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. तर नियुक्त झालेले सदस्य हे विद्यापीठाचे पूर्णकालीन वेतन अधिकारी अधिष्ठाता नसून नियुक्त सदस्यांकडे विद्यापीठाच्या कला व वाणिज्य विभागाचा प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यभार आहे. त्यामुळे त्यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदासाठी ते पात्र नसल्याचे देवेंद्र मराठे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, विद्यापीठाने केलेली ही नियमबाह्य नियुक्ती तात्काळ रद्द करावी. नियुक्ती रद्द न झाल्यास आंदोलन करण्‍यात येईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.