आयुक्तांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा

By Admin | Updated: June 2, 2015 16:49 IST2015-06-02T16:49:05+5:302015-06-02T16:49:05+5:30

शहरातील पांझरा नदी चौपाटीवर आयुक्त डॉ.नामदेव भोसले यांचा ४६ वा वाढदिवस वृक्षलागवड करून साजरा करण्यात आला. महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले.

Commissioner's Birthday Celebrated | आयुक्तांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा

आयुक्तांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा

 धुळे : शहरातील पांझरा नदी चौपाटीवर आयुक्त डॉ.नामदेव भोसले यांचा ४६ वा वाढदिवस वृक्षलागवड करून साजरा करण्यात आला. महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले. या वेळी ४६ लिंबाच्या झाडांची लागवड करण्यात आली तसेच दोन एकर परिसरात स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली.
शहरातील प्रत्येक नागरिकाने आपला वाढदिवस वृक्षलागवड करून साजरा करावा, असे आवाहन आयुक्तांनी या वेळी केले. नवीन वर्षात पदार्पण करताना वयाइतकी झाडे किमान लावावीत, अशी प्रथा पाडण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सुमन फाउंडेशनने १६ व लायन्स क्लबने ३0 झाडे देऊन सहकार्य केल्याचेही या वेळी सांगण्यात आले. अधिकारी व कर्मचार्‍यांनी स्वत: खड्डे खोदून वृक्षलागवड केली. या वृक्षांची जबाबदारी परिसरातील नागरिकांवर सोपविण्यात आली असून ते दररोज झाडांना पाणी देऊन त्यांची देखभाल करणार आहेत.
महापालिकेतही वृक्षारोपण
आयुक्तांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला अधिकारी व कर्मचार्‍यांनी महापालिका आवारात वृक्षलागवड केली. परिसरात विविध वृक्षांची लागवड या वेळी करण्यात आली. 

Web Title: Commissioner's Birthday Celebrated