अमळनेर येथे बंद घरातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST2021-07-30T04:17:08+5:302021-07-30T04:17:08+5:30

अमळनेर : घराच्या मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून महिलेच्या घरातील ८ लाखाचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास ...

From a closed house at Amalner | अमळनेर येथे बंद घरातून

अमळनेर येथे बंद घरातून

अमळनेर : घराच्या मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून महिलेच्या घरातील ८ लाखाचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ताडेपुरा येथे बुधवारी रात्री ९ ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

रेखा अनिल लांडगे ही महिला २८ रोजी रात्री ९ वाजता घराला कुलूप लावून मुलांसह बहादरपूर रोडवरील खळेश्वर कंजरवाड्यात हळदीच्या कार्यक्रमाला गेली होती. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ती परत आल्यावर घराचा दरवाजा तुटलेला दिसून आला. घरातील कपाट पाहिल्यावर त्याचे लॉकरही तोडलेले दिसून आले.

कपाटातील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६ तोळ्यांचे सोन्याचे तीन नेकलेस, १ लाख २० हजार रुपये किमतीचे ३ तोळ्यांचे तीन सोन्याचे कापसह अन्य दागिने आणि अडीच लाख रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले. रेखा लांडगे यांच्या पतीचे ५ महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. महिलेच्या

फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने श्रावण श्याम संदानशिव व बंटी उर्फ विशाल नाना बिऱ्हाडे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे करीत आहेत.

Web Title: From a closed house at Amalner