चोपड्याच्या तीन आरोपीना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 22:23 IST2021-05-26T22:22:34+5:302021-05-26T22:23:10+5:30

अवैध वाळू चोरी पकडायला गेलेल्या तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.

Chopra's three accused arrested | चोपड्याच्या तीन आरोपीना अटक

चोपड्याच्या तीन आरोपीना अटक

ठळक मुद्देसर्व आरोपीना अटक होईपर्यंत तलाठ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : अवैध वाळू चोरी पकडायला गेलेल्या तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपीना पोलिसांनी अटक केली असून पळवून नेलेले एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.

अमळनेरच्या महसूल पथकातील तलाठी गणेश महाजन यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या जगन हरसिंग पावरा (५५, अनवर्दे), महेश ज्ञानेश्वर पवार

(२७, अनवर्दे), धीरज प्रभाकर धनगर (२२, बुधगाव) या तिघांना पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, योगेश महाजन ,विनोद धनगर यांनी अटक केली असून पळवून नेलेले ट्रॅक्टर (एमएच १९सीजे१५३३) जप्त केले आहे. दरम्यान सर्व सहाही आरोपीना अटक होत नाही, तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरूच राहील. गेल्या तीन दिवसांपासून अमळनेर, चोपडा तालुक्यातील काम बंद असल्याने शेतकऱ्यांना सातबारा उतारे, उत्पन्न दाखले, ड पत्रक मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

Web Title: Chopra's three accused arrested