चोपडा पोलीस निरीक्षक मुख्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:02 PM2018-12-08T13:02:06+5:302018-12-08T13:03:04+5:30

अवैध धंद्यांचा ठपका

At the Chopra police inspector headquarters | चोपडा पोलीस निरीक्षक मुख्यालयात

चोपडा पोलीस निरीक्षक मुख्यालयात

Next
ठळक मुद्देतडकाफडकी बदलीमागे राजकीय पार्श्वभूमीची चर्चासात वेळा कारवाई

जळगाव : चोपडा येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यात अपयश आल्याच्या कारणावरून जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी स्थानिक गुन्हा शाखेचे मनोज गणपत पवार यांची बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, किसन नजन पाटील यांनी कारवाई केलेल्या भाजपाच्या आजी-माजी शहराध्यक्षासह अन्य एकाची न्यायालयाच्या आदेशानंतर सबजेलला रवानगी झाली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर नजन पाटील यांची बदली झाल्याची चर्चा आहे.
चोपडा शहर व परिसरात सर्रास अवैध धंदे सुरू होते. याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाईचे आदेश करून त्याकडे दुर्लक्ष झाले होते.
सात वेळा कारवाई
चोपडा परिसरात तब्बल सात वेळा अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली होती. तरीही अवैध धंदे सुरू असल्याने पोलीस उपअधीक्षक निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनीही अवैध धंद्यांवर चोपडा येथे जाऊन कारवाई केली होती. चोपडा शहर व परिसरात जाऊन वरिष्ठ अधिकारी कारवाई करतात पण स्थानिक पोलीस अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या प्रकारांची पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन नजन पाटील यांची पोलीस मुख्यालयात बदली केली.
तिघे कारागृहात
दम्यान, वाहन अडविल्याच्या राग आल्याने पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडल्याप्रकरणी चोपडा पोलिसांनी भाजपाच्या तिघा पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. या तिघांना चोपडा न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी ठोठावल्याने पोलिसांनी त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी केली. या आरोपींची सामान्य रूग्णालयात तपासणीही झाली.
वाहन अडविल्याचा संताप
वाहन अडविल्याच्या कारणावरून भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील, माजी शहराध्यक्ष अनिल उर्फ राजू चिरंजीलाल शर्मा आणि कार्यकर्ते मनिष पारीख यांनी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्याशी व अन्य दोन पोलीस कर्मचाºयांशी हुज्जत घातली होती तसेच नजन पाटील यांची कॉलरही पकडली होती. या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. पोलिसांनी तिघांना चोप दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. तर नजन पाटील यांच्यावर कारवाईची मागणीही होत होती. बदली मागे या वादाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा होती.
जिल्ह्यात चोपडा व अमळनेर येथे प्रचंड अवैध धंदे सुरू आहेत. याकडे स्थानिक पोलीस लक्ष देत नाहीत. मात्र केवळ सीट बेल्ट लावला नाही म्हणून कार्यकर्त्यांना भर चौकात बेदम मारहाण होते. पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेऊन किसन नजन पाटील यांची बदली केली मात्र केवळ बदली न करता चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी आपली मागणी आहे. - उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपा.

Web Title: At the Chopra police inspector headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.