छेडखानी करणार्‍या तरुणाला चोपले

By Admin | Updated: January 6, 2015 12:54 IST2015-01-06T12:43:20+5:302015-01-06T12:54:20+5:30

खान्देश सेंट्रल मॉल परिसरात दुचाकीवरील दोघा तरुणींची छेडखानी करणार्‍या भुसावळ येथील तरुणाला जमावाने चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Chasing a young man who stabbed | छेडखानी करणार्‍या तरुणाला चोपले

छेडखानी करणार्‍या तरुणाला चोपले

कारवाई : खान्देश मॉल परिसरातील घटना

जळगाव : खान्देश सेंट्रल मॉल परिसरात दुचाकीवरील दोघा तरुणींची छेडखानी करणार्‍या भुसावळ येथील तरुणाला जमावाने चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. शहर पोलिसांनी या तरुणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
खान्देश सेंट्रल परिसरात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोन तरुणी या आपल्या दुचाकीवरून जात होत्या. या दरम्यान भुसावळ येथील समीर शेख सलीम शेख व त्याचा मित्र हे दुचाकीवरून आले. दुचाकीवर मागच्या बाजूला बसलेल्या तरुणाने या दोन्ही तरुणींकडे पाहून अश्लील हावभाव करीत छेडखानी करायला सुरुवात केली. 
या तरुणींनी आरडाओरड करीत दोघे तरुण छेडखानी करीत असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांना सांगितले. या प्रकारामुळे समीर याच्या मागे बसलेला तरुण घटनास्थळावरून पळून गेला. जमावाने समीर याला पकडत चांगलाच चोप दिला.
समीरने आपण मोबाईल दुरुस्तीसाठी आल्याचे सांगत छेडखानीचा इन्कार केला. या प्रकाराची माहिती शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांना मिळाली. पोलीस कर्मचारी संजय शेलार व इमरान शेख यांनी घटनास्थळी येत समीरला ताब्यात घेतले. दोन्ही तरुणी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी न आल्याने पोलिसांनी समीर याच्यावर मुंबई पोलीस कायदा ११0 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली.

Web Title: Chasing a young man who stabbed