शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

चंदू चव्हाणचे यांचे जोरदार स्वागत

By admin | Updated: March 25, 2017 20:34 IST

पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर भारतात सुखरुपपणे परतलेला जवान चंदू चव्हाण हे सुटकेनंतर प्रथमच त्याच्या जन्म गावी आले

ऑनलाइन लोकमत

जळगाव (सामनेर), दि. 25 - पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर भारतात सुखरुपपणे परतलेला जवान चंदू चव्हाण हे सुटकेनंतर प्रथमच त्याच्या जन्म गावी शनिवारी (25 मार्च) आले. यानिमित्त त्यांचा तसेच संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा ग्रामस्थांतर्फे सायंकाळी भव्य सत्कार करण्यात आला.

सामनेर येथील मूळ गाव असलेला जवान चंदू चव्हाण हा गेल्यावर्षी २९ सप्टेंबरला अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते. केंद्र सरकारच्या मोठ्या प्रयत्नानंतर चंदू चव्हाण जानेवारी महिन्यात मायदेशी परतले. त्यानंतर प्रथमच २५ रोजी दुपारी चंदूचे आणि डॉ.सुभाष भामरे यांचे आगमन झाले. जोरदार स्वागतानंतर गावातील म.गांधी विद्यालयात ग्रामस्थांतर्फे आयोजित सत्कार समारंभात भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी , परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे जवान चंदू चव्हाण याला पाकच्या तावडीतून सुखरुपणे स्वदेशात आणता आले.

दोघांचा सत्कार सरपंच प्रिती साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चंदू व त्याचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.