शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान आमदारांना शह देण्याचे आव्हान !

By admin | Updated: September 23, 2014 10:29 IST

विधानसभा निवडणुकीचा बिगुलवाजल्यानंतरही अद्याप आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा नसल्याने कार्यकर्त्यांतही चलबिचल आहे.

जामनेर : विधानसभा निवडणुकीचा बिगुलवाजल्यानंतरही अद्याप आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा नसल्यानेकार्यकर्त्यांतही चलबिचल आहे. तर दुसरीकडे विधानसभा प्रतिनिधित्वाचे पंचक पूर्ण करण्यासाठी आमदार गिरीश महाजन तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. भाजपाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

२00९ च्या विधानसभा निवडणुकीत जि.प. सदस्य संजय गरुड यांनी जोरदार टक्कर दिल्याने निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. केवळ साडेसात हजारांच्या मताधिक्याने झालेला विजय भाजपालाही विचार करायला लावणारा होता. यामुळेच या निवडणुकीची भाजपाने परिपूर्ण तयारी केलेली आहे. मराठाबहुल असलेल्या या मतदारसंघात मराठा उमेदवार देण्यावर आघाडीचा भर आहे. यामुळे काँग्रेसमधील चौघा इच्छुकांपैकी डिगंबर पाटील यांना अधिक पसंतीदिली जात आहे. यामुळे त्यांचेच तिकीट निश्‍चित होईल, अशीच चर्चा कार्यकर्त्यांत आहे. म्हणूनच यंदाच्या निवडणुकीच्या तयारीत असलेल्या संजय गरुड यांनीही पाटील यांच्यासाठी माघार घेतली आहे.
१९९५ पासून भाजपाचा बालेकिल्ला झालेल्या या मतदारसंघाला भेदण्यासाठी काँग्रेसही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. डिगंबर पाटील यांनीही तालुक्यात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. पण उमेदवाराचे नाव निश्‍चित होत नसल्याने थोडी चलबिचल आहे. तर दुसर्‍या बाजूलाभाजपातर्फे गटप्रमुख, गणप्रमुख, बूथप्रमुख यांच्या बैठका होऊन मतदार याद्याही कार्यकर्त्यांपर्यंत पोहचल्या आहेत. आमदार गिरीश महाजन यांचा तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत असलेला थेट संपर्क, सुखा-दु:खाच्या क्षणात त्यांची होणारी भेट ही त्यांची बलस्थाने आहेत. त्यात त्यांची आरोग्यसेवा पुरवण्याबाबत जामनेर- जळगाव- मुंबईपर्यंत असलेली यंत्रणा, भाजपाकडे सामान्य कार्यकर्त्यांची असलेली मोठी फळी, जि.प.च्या सातपैकी सहा जागांवर असलेले प्रतिनिधी, पं.स.च्या १४ पैकी १0 जागा, ७0 टक्के ग्रामपंचायती ताब्यात असल्याने तालुक्यात भाजपा विरोधकांपेक्षा वरचढच आहे. 
आमदार महाजन यांच्यासह कार्यकर्तेही जनतेच्या सतत संपर्कात रहात असल्याने त्यांना मोठा फायदा होतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
राज्यात १५ वर्षांपासून आघाडीचीसत्ता असली तरी मतदारसंघातील भाजपाविरोधकांना नेहमी संपर्कात राहून कामे करणे जमलेले नाही. त्यात डिगंबर पाटील तोंडापूर, तर संजय गरुड शेंदुर्णीला रहात असल्याने त्यांचा शहरातील संपर्क तुटतो.
त्याचवेळी जामनेर तालुक्याचे मुख्यालय असल्याने समस्या, अडचणी घेऊन नागरिक येथेच येतात. दीड वर्षापूर्वी आघाडीने एकी करून न.पा. ताब्यात घेतली.मात्र त्यातही दोन गट होऊन कलगीतुरा रंगला. नंतर सारवासारव झाली. मात्र ती टिकावू वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत तर तालुक्यात भाजपाला आतापर्यंतचे सर्वाधिक यश मिळाले. ३९ हजारांचे मताधिक्य रक्षा खडसेंना मिळाल्याने कार्यकर्त्यांत उत्साही वातावरण आहे. त्यात राज्यात युतीचे शासन आल्यास आमदार महाजन यांना मंत्रिपद मिळणार. याच आकांक्षेने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. यामुळे विद्यमान आमदारांना शह देणे काँग्रेससाठी कडवे आव्हान ठरणार आहे.