शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

‘आमदारकी’साठी गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:34 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांच्या तयारीला सुरुवात, दुष्काळ, पाणीटंचाईपासून तर जनतेच्या जिव्हाळ्याच्या, अभिमानाच्या विषयांसंदर्भात इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीत खान्देशातील चारही मतदारसंघात उमेदवारीवरुन मोठी उलथापालथ झाली. विधानसभेच्यादृष्टीने ही रंगीत तालीम होती. सगळ्याच राजकीय पक्षांमधील हा गोंधळ पहाता इच्छुक उमेदवारांनी आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हालचालींची खबरबात ठेवत असताना जनतेपुढे आपण सतत कसे राहू याचा खटाटोप सुरु आहे. त्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहेत. ही निवडणूक रोमांचक ठरेल, असे चित्र आहे.महाराष्टÑाच्या विधानसभेसाठी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साडेतीन महिने आता राजकीय पक्षांच्या हाती उरले आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर युती आणि आघाडीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. निकाल अपेक्षेप्रमाणे लागले तर आलबेल राहील. दगाफटका, विश्वासघात असे प्रकार घडले तर पुन्हा म्यान केलेल्या तलवारी बाहेर निघतील. एकमेकांचे उणेदुणे काढले जाईल. युती आणि आघाडीचा फेरविचार होऊ शकेल. केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास गेल्यावेळेसारखा भाजपकडे इच्छुकांचा ओढा असेल. सत्ता न मिळाल्यास काँग्रेस, राष्टÑवादीकडे इच्छुक वळतील.गेल्या निवडणुकीचा विचार केला तर काँग्रेस, राष्टÑवादी, भाजप आणि शिवसेना या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. खान्देशात २० जागांपैकी सर्वाधिक १० जागा भाजपला मिळाल्या होत्या. पाच जागा जिंकत काँग्रेस दुसऱ्या तर तीन जागा जिंकत शिवसेना तिसºया क्रमांकावर होती. राष्टÑवादी कॉंग्रेस आणि अपक्ष एका जागेवर निवडून आले होते. स्वबळ प्रत्येकाने अजमावले आहे. त्यानंतर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुकीत युती-आघाडी करुन हे पक्ष लढले आहेत. कुरबुरी झाल्या तरी युती-आघाडीशिवाय पर्याय नाही, हेदेखील धुरिणांना कळून चुकले आहे.लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन झालेली उलथापालथ लक्षात घेऊन इच्छुक उमेदवार हे स्वत:ची प्रतिमानिर्मिती करण्यात मग्न आहेत. स्वयंभू नेते ‘सर्वपक्षसमभाव’बाळगून आहेत. या पक्षाने नाही दिले तर दुसरा...अशा भूमिकेतून प्रयत्न सुरु आहेत. जनतेची स्मरणशक्ती कमकुवत असते हे लक्षात घेऊन निवडणुकीच्या सहा महिने आघी कामाचा झपाटा लावण्याकडे इच्छुकांचा कल दिसत आहे. विद्यमान आमदारदेखील दुष्काळ, टंचाई याविषयी प्रचंड जागरुक असून प्रशासनाशी जुळवून घेत कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.पाण्याचा टँकर, विहीर गावासाठी खुली करणे, कॉलनीत पाण्याचे जार पोहोचवणे, चौक, उद्यान, किल्ले यांचे सुशोभीकरण, जलसंधारण, पर्यावरण, वृक्षारोपण कार्यात सक्रीय सहभाग घेणे अशा माध्यमातून जनतेशी निकटता आणि पुढाकार यासाठी इच्छुकांची धडपड चालली आहे. हे सगळे करीत असताना राजकीय पक्षांमधील नेते, संघटनात्मक पदाधिकारी यांच्याशी संपर्क, संवाद व समन्वय राखला जात आहे. स्वत:विषयी, केलेल्या कामांविषयी ‘फाईल’तयार केली जात आहे. राजकीय पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहेच. सर्वेक्षण जरी अद्याप सुरु झालेले नसले तरी कानोसा घेतला जात आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून ‘मुंबई’ला जायची सगळ्यांची तयारी आहे.यंदाची लोकसभा निवडणूक वैशिष्टयपूर्ण ठरत आहे. मतदानाचे पाच टप्पे आटोपले आणि आता केवळ दोन टप्पे उरले आहेत. विजयाचे दावे सगळे करीत असले तरी ठामपणा त्यात दिसून येत नाही. खान्देशचा विचार केला तर कोणताही उमेदवार विजयाची हमखास खात्री देताना दिसत नाही. विजयाचे गणित जुुळवताना कमी-अधिक मतदान, विविध समाजघटकांचा कल, पक्ष, युती-आघाडीअंतर्गत नाराजी, रुसवे-फुगवे असे घटक परिणामकारक ठरत असतात. गुप्तचरांचे अंदाज, सट्टाबाजाराचा कल, पक्षांतर्गत सर्वेक्षण, आकडेमोड वेगवेगळे निकाल सांगत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव