भाऊबीजेसाठी बहिणीकडे आलेल्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 17:31 IST2018-11-11T17:31:18+5:302018-11-11T17:31:50+5:30
भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी आलेल्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना शिंदखेडा येथे घडली.

भाऊबीजेसाठी बहिणीकडे आलेल्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू
जळगाव : भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी आलेल्या भिका सहादू पाटकरी (माळी) (६६, रा. बेटावद ता.शिंदखेडा) यांचा रविवारी पहाटे हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना कळमसरे ता. अमळनेर येथे घडली.
भाऊबीजेसाठी भिका हे बहीण शकुंतला काशीनाथ महाजन (कळमसरे) यांच्याकडे आले होते. शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. तिथून तातडीने अमळनेरला नेत असतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पाहुणा म्हणून आलेल्या भावाच्या मृत्यूने वयोवृद्ध बहिणीला शोक अनावर झाला. रविवारी दुपारी बेटावद या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. धुळे ग.स.बँकेच्या शिरपूर शाखेतून ते सेवानिवृत्त झाले होते.