Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:39 IST2025-06-16T17:24:02+5:302025-06-16T17:39:18+5:30

Israel Iran War : सोमवारी सकाळी अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस निमित्झ दक्षिण चीन समुद्रातून पश्चिमेकडे निघाली आहे. व्हिएतनाममधील डानांग येथील स्वागत बंदर अचानक रद्द करण्यात आले.

Israel Iran War Something big is about to happen US aircraft carrier leaves for the Middle East; Will Israel-Iran war break out? | Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

Israel Iran War :  मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये तणाव सुरू आहे. इराणवर आधी इस्त्रायलने मोठा हल्ला केला. या हल्ल्याला इराणनेही जोदार प्रत्युत्तर दिले. मध्य पूर्वेतील या दोन देशातील तणावामुळे जग तिसऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहे, आता या तणावात आणखी मोठी काहीतरी घडणार असल्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेचे भलेमोठे विमानवाहू जहाज  यूएसएस निमित्झ दक्षिण चीन समुद्रातून पश्चिमेकडे निघाले आहे. यामुळे सगळ्या जगाचे लक्ष इराण -इस्त्रायलकडे लागले आहे. 

क्षेपणास्त्र डागणाऱ्या इराणी सैनिकांना इस्रायलने संपवले; IDF ने समोर आणला हल्ल्याचा VIDEO

सोमवारी सकाळी अमेरिकन विमानवाहू जहाज यूएसएस निमित्झ दक्षिण चीन समुद्रातून पश्चिमेकडे जाताना दिसले, असे जहाज ट्रॅकिंग वेबसाइट मरीन ट्रॅफिकने वृत्त दिले आहे. व्हिएतनामच्या डानांग शहरात या जहाजाचे नियोजित बंदर कॉलसाठी होणारा स्वागत समारंभ रद्द करण्यात आले आहे.

या आठवड्यात डानांग शहरात २० जून रोजी एक औपचारिक स्वागत समारंभ होणार होता, राजनयिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा समारंभ अचानक रद्द करण्यात आला. हनोईमधील अमेरिकन दूतावासाने या रद्दीकरणाची माहिती दिली. या रद्द कार्यक्रमाचा संदर्भ "आपत्कालीन ऑपरेशनसोबत जोडला आहे. 

अमेरिकेकडून अजून माहिती दिलेली नाही 

याबाबत अमेरिकेकडून काहीही सांगितले नाही. यूएसएस निमित्झ कॅरियर स्ट्राइक ग्रुपने गेल्या आठवड्यात दक्षिण चीन समुद्रात सागरी सुरक्षा मोहिमा राबवल्या. ही कारवाई "इंडो-पॅसिफिक प्रदेशात अमेरिकन नौदलाच्या नियमित उपस्थितीचा भाग होती. ही माहिती यूएस पॅसिफिक फ्लीटच्या कमांडरच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

शिप ट्रॅकिंग डेटानुसार, यूएसएस निमित्झ सोमवारी सकाळी पश्चिमेकडे जात होते, मध्य पूर्वेकडे जात होते, तिथे सध्या इस्रायल आणि इराणमध्ये तणाव आणि संघर्ष वाढत आहे. या प्रदेशातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अमेरिकन नौदलाचे हे पाऊल धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.

यूएसएस निमित्झ हे दक्षिण चीन समुद्रातून निघून पश्चिमेकडे जाणे आणि व्हिएतनाममधील आपला बंदर कॉल रद्द करणे हे प्रादेशिक सुरक्षेबाबत अमेरिकेच्या धोरणात बदल दर्शवू शकते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही.

Web Title: Israel Iran War Something big is about to happen US aircraft carrier leaves for the Middle East; Will Israel-Iran war break out?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.