शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:16 IST

जळगाव : तालुक्यातील सावखेडा शिवारात जलाराम मंदिराच्या मागे गिरणा नदीपात्रात मंगळवारी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास २५ ते ...

जळगाव : तालुक्यातील सावखेडा शिवारात जलाराम मंदिराच्या मागे गिरणा नदीपात्रात मंगळवारी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सावखेडा बुद्रूक येथील पोलीसपाटील चंद्रकांत उत्तमराव सोनवणे यांना गिरणा नदीपात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृतदेह पाण्यात पडून असल्याने तो कुजला होता तसेच त्याला दुर्गंधी सुटलेली होती. पोलीसपाटील चंद्रकांत सोनवणे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलीस हवालदार अनिल तायडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व पंचनामा केला. याप्रकरणी पोलीसपाटील चंद्रकांत सोनवणे यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वय अंदाजे २५ ते ३० वर्ष, शरीराने सडपातळ, रंगाने सावळा, चेहरा गोल, अंगात बदामी रंगाचा शर्ट, गदड बदामी रंगाची पॅन्ट असे मयताचे वर्णन आहे. या वर्णनावरून ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.