शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

जळगाव : पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ रेल्वे रुळावर बुधवारी सकाळी ९ वाजता अनोळखी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. ही ...

जळगाव : पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ रेल्वे रुळावर बुधवारी सकाळी ९ वाजता अनोळखी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रात्री घडल्याचा अंदाज असून अपघात आहे की, आत्महत्या हे स्पष्ट झालेले नाही. संबंधित वृद्धाला पाठीमागून मार लागल्याने बरगड्या तुटल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास अमलदार समाधान कंखरे व स्वप्नील महाले करीत आहेत.

गोलाणी मार्केटमधून दुचाकी लांबविली

जळगाव : गोलाणी मार्केटच्या पार्किंगमधून गोपाळ अशोक पोलभुणे (रा.पिंप्राळा) यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.टी.३१७६) लांबविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.याप्रकरणी मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडली येथे आजपासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

जळगाव : तालुक्यातील वडली येथे श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लबतर्फे ४ फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला सामना आदर्श क्रिकेट टीम लासगाव व वैष्णवी कन्स्ट्रक्शन जळगाव यांच्यात होणार आहे. प्रगतिशील शेतकरी शेषराव रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद‌्घाटन होणार आहे. ५१ हजारांचे प्रथम पारितोषिकही त्यांच्याकडूनच देण्यात येणार आहे. संभाजी पाटील, जगन्नाथ पाटील व मुनील पाटील यांच्याकडून द्वितीय व तृतिय पारितोषिक रोख स्वरुपात दिले जाणार आहे. भूषण रोंदळे, सचिन पाटील, शिवाजी जाधव व विनोद पाटील यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

शहरात गस्त वाढवा

शहरात घरफोड्या, बॅगा लांबविणे या सारख्या घटना वाढलेल्या असतानाच आता दरोड्याची घटना घडली आहे. पोलिसांची गस्त कमी झाल्याचा हा परिणाम असून शहरात दिवस-रात्र गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.