डॉ.गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST2021-07-11T04:13:26+5:302021-07-11T04:13:26+5:30

लोकमत न्यूूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रवादीचे नेते स्व.डॉ.अब्दुल गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ डॉ.अब्दुल गफ्फार मलिक फाऊंडेशन व लोकमत यांच्या ...

Blood donation camp in memory of Dr. Gaffar Malik today | डॉ.गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ आज रक्तदान शिबिर

डॉ.गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ आज रक्तदान शिबिर

लोकमत न्यूूज नेटवर्क

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते स्व.डॉ.अब्दुल गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ डॉ.अब्दुल गफ्फार मलिक फाऊंडेशन व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ११ ते ४ यावेळेत शनीपेठेतील मलिक हाऊस येथे हे शिबिर होणार आहे.

यासह लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमाअंतर्गत रविवारी शहर व परिसरात ७ ठिकाणी रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे. नॉन कोविड यंत्रणेत रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून हे शिबिर घेण्यात येत असून लोकांनी रक्तदान करून यात योगदान द्यावे, असे आवाहन वाहाब मलिक, एजाज मलिक, नदीम मलिक, फैसल मलिक यांनी केले आहे. दरम्यान, रविवारी शिरसोली जि.प.शाळा, लमांजन, जैन युवा फाउंडेशनतर्फे सुरभी लॉन येथे, सिंधी पंचायतीतर्फे झुलेलाल हॉल, आर. आर. विद्यालया शेजारी येथे, जनमत प्रतिष्ठानतर्फे बेंडाळे कॉलेज जवळ, रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिर होणार आहे.

Web Title: Blood donation camp in memory of Dr. Gaffar Malik today