शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

त्या ठरावांची माहिती भाजपने मागवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

जळगाव - नुकत्याच झालेल्या महासभेत भाजपाने विराेध केल्यानंतरही बहुमताने मंजुर करण्यात आलेल्या ठरावांची भाजपाने प्रशासनाकडे मागणी केली आहे. नगरसेविका ...

जळगाव - नुकत्याच झालेल्या महासभेत भाजपाने विराेध केल्यानंतरही बहुमताने मंजुर करण्यात आलेल्या ठरावांची भाजपाने प्रशासनाकडे मागणी केली आहे. नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी यासंदर्भात नगरसचिवांना पत्र देवून ठरावांची पत्र मागितली आहे. गाळे लिलाव, वाॅटर ग्रेससाठी लवाद नियुक्ती, महिला स्वच्छतागृह, पिंप्राळा येथील मनपा रूग्णालय, ४२ काेटी रूपयांच्या निधीसंदर्भात ठराव करण्यात आले आहेत. या सर्व विषयांवर भाजपाने विराेधाची भुमीका बजावली आहे. त्यामुळे हे ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठीच ॲड. हाडा यांनी मंगळवारी नगरसचिवांना पत्र देवून ठरावांची मागणी केली.

भाजपतर्फे रिक्षा चालकांकरिता ऑनलाईन कक्ष स्थापन

जळगाव - कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या परवानाधारक रिक्षाचालकांना सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळावा यासाठी भाजपतर्फे नूतन मराठा कॉम्प्लेक्समधील आमदार सुरेश भोळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सेवा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मंगळवारपासून या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली असून, या कक्षाचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, भाजप ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी, उपाध्यक्ष संदीप वाणी, रिक्षा चालक रमेश सोनार, काशिनाथ चौधरी, शरद जोशी, गणेश चौधरी, सुभाष पाटील, हितेंद्र टेकावडे आदी उपस्थित होते. हा कक्ष ५ जून पर्यंत सुरू राहणार आहे.