चोपडा येथे ‘रोटरी भवन’चे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST2021-06-29T04:12:15+5:302021-06-29T04:12:15+5:30

रोटरी क्लब चोपडा ही संस्था आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. दि. २४ जून रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट-३०३० चे प्रांतपाल ...

Bhumi Pujan of 'Rotary Bhavan' at Chopda | चोपडा येथे ‘रोटरी भवन’चे भूमिपूजन

चोपडा येथे ‘रोटरी भवन’चे भूमिपूजन

रोटरी क्लब चोपडा ही संस्था आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. दि. २४ जून रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट-३०३० चे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी रोटरी क्लबला सदिच्छा भेट दिली असता, त्याचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते रोटरी क्लब, चोपडा व चोपडा रोटरी सेवा संस्था यांच्या हस्ते रोटरी भवनचे भूमिपूजन करण्यात आले.

रोटरी भवनासाठी चोपडा नगर परिषदेने जवळपास दहा हजार चाैरस फूट एवढी जागा शिरपूर रोडवरील हरेश्वर कॉलनी येथे उपलब्ध करून दिली आहे. त्याचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी कळविले आहे.

शब्बीर शाकीर यांनी सपत्नीक भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले.

माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लबचे पन्नास वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगितले तर, प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी चोपड्याला गौरवशाली अशी परंपरा असल्याचे सांगितले. शब्बीर शाकीर यांचा सत्कार चोपडा रोटरी सेवा संस्थेचे अध्यक्ष अशिष गुजराथी यांनी, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा सत्कार रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी केला.

Web Title: Bhumi Pujan of 'Rotary Bhavan' at Chopda