शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

भीक मागितल्याने मारला झारा

By admin | Updated: May 5, 2015 14:41 IST

भीक मागितली म्हणून दहा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डोक्यात झारा मारून तिला गंभीर जखमी करण्याचा प्रकार रविवारी समोर आला

जळगाव : भीक मागितली म्हणून दहा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डोक्यात झारा मारून तिला गंभीर जखमी करण्याचा प्रकार रविवारी समोर आला. आईजवळ पैसे नसल्याने तिने मुलीवर घरीच उपचार केले. मात्र जखम मोठी असल्याने रात्रभर त्यातून रक्तस्त्राव होत राहिला. या प्रकाराद्दल पोलीसात तक्रार नोंदविण्यात आली. मात्र पोलिसांनी झारा मारणार्‍या विक्रेत्यावर केवळ अदखपात्र गुन्हा दाखल केला आहे.टिचभर पोटाचे खळगे भरण्यासाठी माणूस स्वत:शीच झगडत असतो. या झगड्यात त्याला माणूसकी जपणारे माणसं भेटतात. आणि त्याची आयुष्यासोबत सुरू असलेली झुंज सहज सोपी होते. मात्र काहींच्या नशिबी झगडा हा कायम असतो. परिस्थितीवर मात करणं त्यांचं कधीच स्वप्न नसतं. मात्र वेळ निभाऊन नेण्याचे पर्याय त्यांना माहित असतात. भीक मागणे असाच एक पर्याय निवडलेल्या पाळधी येथील गरिब कुटुंबातील पूजाला (१0 वर्षे) इडली-सांबार विक्रेता प्रकाश तुकाराम सपकाळे, असोदा याने भीक मागितली म्हणून झारा मारून फेकला. 

तुझ्याकडून होईल ते कर...

 सोमवारी नुकसान भरपाई मागण्यासाठी विक्रे त्याकडे मुलीची आई गेली असता, जखम किरकोळ आहे. मुलीला काहीही झालेले नाही. मला पैसे मागू नको. तुझ्याकडून होईल ते कर. असे आरोपीने (विक्रेत्याने) तिला सांगितले. न्याय मिळेल म्हणून या महिलेने पोलिसांकडे रविवारी धाव घेतली आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली.केवळ अदखलपात्र गुन्हागंभीर जखमी झालेल्या मुलीच्या आईच्या फिर्यादीवूरन पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. विक्रेत्याला दम दिला असून तुम्ही पुन्हा त्याच्याकडे जाऊ नका, असे आईला ठासून सांगण्यात आले आहे