शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उधारीचे पैसे मागितल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST

जळगाव : उधारीचे पैसे मागितल्याचा रा. आल्याने राकेश सखाराम पवार (वय १९, रा. आझादनगर) या तरुणास राकेश ऊर्फ विक्की, ...

जळगाव : उधारीचे पैसे मागितल्याचा रा. आल्याने राकेश सखाराम पवार (वय १९, रा. आझादनगर) या तरुणास राकेश ऊर्फ विक्की, ज्ञानेश्वर याचा लहान भाऊ (रा. कोठारी नगर) व अनोळखी दोघांनी रामानंद नगरातील शंभर फुटी रस्त्यावर अडवून रॉडने मारहाण केल्याची घटना ९ जून रोजी दुपारी अडीच वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

असोदा येथून दुचाकी चोरी

जळगाव : तालुक्यातील असोदा येथील महाजन वाड्यातील चिंतामण भास्कर पाचपांडे (२४) या तरुणाची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच १९ डीसी ११७१) १५ जून रोजी चोरी झाली आहे. २५ ते ३० वयोगटातील दोन तरुणांनी ही दुचाकी लांबविल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी बुधवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कानळदा शिवारातून पाण्याच्या पंपाची चोरी

जळगाव : तालुक्यातील कानळदा शिवारातील चंद्रकांत दिनकर राणे यांच्या शेताच्या बांधावरून आनंदा दगडू सपकाळे यांच्या मालकीचा दहा हजार रुपये किमतीचा पाण्याचा पंप १४ जून रोजी चोरी झाला आहे. याप्रकरणी विश्वनाथ देवीदास भोई (रा.पाळधी, ता. धरणगाव) व प्रेमचंद निंबा नन्नवरे (रा. कानळदा, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध बुधवारी तालुका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

खुर्ची तोडल्याने मारहाण

जळगाव : लहान मुलीने खुर्ची तोडल्याच्या कारणावरून अल्ताफ छोटू शहा, शाबीर शहा बहादूर शहा, सईदाबी ऊर्फ शबानाबी शाबीर शहा व रसिदाबी छोटू शहा (सर्व रा. शिवाजीनगर) यांनी मनोज भाऊराव जाधव (वय २२) या तरुणाला दगड, विटा व कुकरने मारहाण केल्याची घटना १४ जून रोजी दुपारी २ वाजता शिवाजी नगरातील शिवशक्ती नगरात घडली. याप्रकरणी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास संजय झाल्टे करीत आहे.