शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीकडे सापडले गावठी पिस्तुल

By admin | Updated: March 27, 2017 00:27 IST

कृष्णा सोनवणे याच्याकडे रविवारी दुपारी साडे चार वाजता आसोदा रस्त्यावर मोहन टॉकीज परिसरात गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस आढळून आले.

जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या कृष्णा विक्रम सोनवणे (वय २२ रा.प्रजापत नगर,जळगाव) याच्याकडे रविवारी दुपारी साडे चार वाजता आसोदा रस्त्यावर मोहन टॉकीज परिसरात गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस आढळून आले. हे पिस्तुल बाळगून कृष्णा हा प्रजापत नगर व वाल्मिक नगरात दहशत माजवत होता. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रजापत नगर व मोहन टॉकीज परिसरात एका तरुणाकडे कमरेला पिस्तुल लावलेले आहे, मात्र ते खेळण्याचे आहे की, खरे याबाबत सांशकता आहे, परंतु हे पिस्तुल दाखवून तो दहशत पसरवित असल्याची गुप्त माहिती शनी पेठचे पोलीस कर्मचारी जितेंद्र सोनवणे यांना मिळाली होती.  पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी जितेंद्र सोनवणे, अनिल धांडे, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे, नरेंद्र सपकाळे, संजय धनगर व मोतीलाल पाटील यांचे पथक तत्काळ दोन्ही ठिकाणी रवाना केले. कृष्णा हा निकेश सोनवणे याच्या खुनातील आरोपी असल्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सांगितले.  २०१४ मध्ये निकेशचा खून झाला होता. पोलिसांनी आवाज देताच काढला पळमोहन टॉकीज परिसरात एका पानटपरीवर वर्णनानुसार कृष्णा हा दिसून आला. गणेश गव्हाळे यांनी त्याला विचारणा करताच तो तेथून पळत सुटला. पसार होण्याच्या आत पुढे थांबलेल्या अन्य सहकाºयांनी त्याला घेरुन पकडले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तुल व त्यात एक जीवंत काडतूस आढळून आले.