बेअरस्टोने फोडला फ्रीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST2021-04-19T04:14:38+5:302021-04-19T04:14:38+5:30

मुंबई इंडियन्सच्या पाच बाद १५० धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादला तुफानी सुरुवात करून दिली. ...

Bairstone broke freeze | बेअरस्टोने फोडला फ्रीज

बेअरस्टोने फोडला फ्रीज

मुंबई इंडियन्सच्या पाच बाद १५० धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादला तुफानी सुरुवात करून दिली. त्यात बेअरस्टोने ट्रेंट बोल्टला एकाच षटकात तीन चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्या या षटकाराने डगआऊटमधील फ्रीजच्या काचा तुटल्या. आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तो हिटविकेट झाला.

काव्या मारन ठरतेय सामना पाहण्याचे कारण

सनरायजर्स हैदराबादला यंदाच्या सत्रात आपल्या तीनही सामन्यात एकही विजय मिळ‌वता आला नाही. मात्र सनरायजर्सचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी काव्या ही प्रत्येक सामना पाहण्यासाठी उपस्थित असते. आता सनरायजर्सच्या खेळापेक्षा तिचीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. सनरायजर्सचा सामना पाहण्यासाठी तीच तर कारण ठरतेय, अशी चर्चादेखील आता सोशल मीडियावर सुरू आहे.

डिव्हिलियर्सने कुठे केले होते पत्नीला प्रपोज

रॉयल चँलेजर्स बँगलोरचा धडाकेबाज फलंदाज ए.बी. डिव्हिलियर्सने त्याची पत्नी डॅनियलीला आग्रा येथील ताजमहलमध्येच लग्नासाठी विचारले होते. सोशल मीडियात एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना डॅनियली हिने याचा खुलासा केला. एबीडी दक्षिण आफ्रिकेतील वॉटरबर्ग डोंगराच्या पायथ्याशी पहिल्यांदाच डॅनियलीला भेटला होता.

Web Title: Bairstone broke freeze