शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज फेडण्यासाठी फोडले एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:34 IST

सायरन अन् सतर्क पोलिसांमुळे चोरटा जेरबंद

जळगाव : अनेक प्रयत्न करुनही कर्ज फिटत नसल्याने विजय बन्सी अहिरे (३०, रा.खेडी बुद्रुक, जळगाव) या तरुणाने मध्यरात्री नाथ प्लाझा संकुलातील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडले. मशीनमध्ये छेडछाड होताच अत्याधुनिक यंत्रणेमुळे हैदराबाद येथील मुख्यालयात सायरन वाजला, आणि क्षणातच स्थानिक पोलीस एटीएमजवळ पोहचले. विजय हा तिथून बाहेर पडतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.चित्रपटातील कथेप्रमाणेच ही घटना घडली. तोंडाला मास्क, डोक्याला रुमाल तसेच एटीएम फोडण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेवून विजय एटीएम फोडण्यासाठी आला होता. त्याच्याकडून पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले आहे.विशेष म्हणजे त्याच्या बॅगेत दारुच्या दोन बाटल्याही मिळून आल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यापूर्वी देखील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एटीएम फोडण्याचा असाच प्रयत्न झाला होता. तेव्हाही उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या सतर्कतेमुळे चोरटे पसार होऊन रोकड सुरक्षित राहिली होती.शहरातील व्यवस्थापकालाही आला संदेशस्टेट बॅकेचे एटीएम क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीकृष्ण अनंत करंदीकर यांनाही रविवारी रात्री एटीएममधील छेडछाडीबाबत संदेश प्राप्त झाला होता. त्यानुसार त्यांनी सोमवारी सकाळी एटीएम अभियंता राहूल संतोष पाटील (रा.मुक्ताई कॉलनी) व विशाल श्रावण सपकाळे (रा.श्रीकृष्ण पोलीस कॉलनी, निमखेडी रोड) यांच्यासोबत नाथा प्लाझामधील एटीएमची पाहणी केली. यात एटीएमचे तोडफोड केल्याने ३ लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत करंदीकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान दर शुक्रवारी एटीएममध्ये १२ लाखांची रोकड टाकली जाते. याला दोन दिवस उलटल्याने एटीएममध्ये रोकड शिल्लक नव्हती. शुक्रवारी प्रयत्न झाला असता मोठी रोकड तरुणाच्या हाती लागली असती, अशी माहिती मिळाली आहे.रात्री १.३८ वाजता हैदराबादला वाजला सायरन अन् पोलिसांना फोनरविवारी रात्री १.३८ वाजता नाथा प्लाझातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न होताच हैदराबाद येथे सायरन वाजला. तेथून लागलीच शहर पोलीस ठाण्याशी संपर्क झाला. ठाणे अंमलदार निलेश बडगुजर यांना एटीएम फोडण्याचा प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. ठाणे अंमलदार बडगुजर यांनी तत्काळ गस्तीवरील शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील गजानन बडगुजर व भास्कर ठाकरे यांना माहिती कळविली.दोघेही पोलीस कर्मचारी शाहू नगरात हाणामारीच्या प्रकाराची चौकशी करत होते. मात्र ठाणे अंमलदाराकडून एटीएम फोडण्याच्या प्रकाराची माहिती मिळताच दोघांनी तत्काळ नाथा प्लाझा संकुल गाठले. एटीएम मशीनच्या बाहेर हे कर्मचारी थांबले. त्याचवेळी तोंडाला मास्क तसेच पाठीवर बॅग लटकविलेला तरुण एटीएमच्या बाहेर पडला. कर्मचारी गजानन बडगुजर यांनी मोबाईलमध्ये तरुणाचा फोटो काढला, यानंतर तरुणाने तोंडावरील मास्क काढले. बडगुजर तसेच ठाकरे यांनी दोघांनी तरुणाची चौकशी केली असता मुंबईला जात असून पैसे काढण्यासाठी आलो होतो, अशी खोटी माहिती दिली.पोलिसांनी पैसे निघाले काय अशी विचारणा केल्यावर तरुणाने नाही असे उत्तर दिले. संशय आल्याने बडगुजर व ठाकरे यांनी तरुणाला थांबवून ठेवत एटीएमच्या आतमध्ये जावून पाहणी केली असता, चारही बाजूने एटीएम फोडलेले दिसून आले. त्याला ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. तेथे निरीक्षक निकम लगेच दाखल झाले.कर्जासाठी तगादा लागल्याने निवडला मार्गपोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी तरुणाची चौकशी केली असता, त्याने विजय बन्सी अहिरे असे नाव सांगितले. खेडी बुद्रूक येथील आंबेडकर नगरात राहतो. हातऊसनवारीचे तीन लाख कर्ज झाले आहे. अनेक प्रयत्न व मजुरी करुनही कर्ज फिटत नाही, त्यात पैशासाठी लोकांचा तगादा सुरु आहे. त्यामुळे ही रक्कम परतफेड करण्यासाठी एटीएम फोडण्याचा मार्ग निवडल्याचे त्याने चौकशीत सांगितले.दरम्यान, पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव